मास्कमुक्ती संदर्भात कोणताही निर्णय नाही : उपमुख्यमंत्री
महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत. अशात महाराष्ट्र मास्कमुक्त होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
अजित पवार यांनी बोलताना म्हटलं आहे की,जोपर्यंत कोरोना आपल्यातून जात नाही तोपर्यंत मास्क लावायचाच, ज्या दिवशी मास्क काढण्याबाबत ठरेल आम्ही अगदी पत्रकार परिषद घेऊन सांगू. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्कमुक्तीसंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही, ना बोलणं झालंय, असंही ते म्हणाले.

0 Comments