सोलापूर : वंचित बहुजन आघाडीची महापालिकेसाठी 65 जणांची जंबो कार्यकारिणी ; शहराध्यक्ष पदी कोण पहा
सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी सोलापूर शहर अध्यक्षासह विविध पदाधिकाऱ्यांची निवड केल्या आहेत यामध्ये 65 जणांची जम्बो कार्यकारिणी त्यांनी जाहीर केली आहे.
त्यामध्ये सोलापूर शहर अध्यक्षपदी पुनश्च एडवोकेट हजरतअली बडेखान यांची निवड झाली असून दोन महासचिव म्हणून अमर ज्ञानदेव पवार व एडवोकेट अखिल रामचंद्र शाक्य तर कोषाध्यक्ष पदी रविकांत पळसे यांच्या निवडी झाल्या आहेत. या 65 जणांमध्ये 18 उपाध्यक्ष, 21 संघटक पाच सचिव, 2 सहसचिव, 2 सल्लागार, 1 प्रसिद्धी प्रमुख,10 सदस्य अशी 65 जणांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
कुणाला मिळाले कोणते पद पहा ही यादी

0 Comments