पैशासाठी नातेही विसरला ; आजीचे कुऱ्हाडीने पाय तोडले आणि...नातवाचे कृत्य पाहून पोलिसांच्याही डोळ्यात पाणी आले
इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात एका 75 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी तिच्या नातवासह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी 500 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या दागिन्यांसाठी या वृद्ध महिलेचा खून केला आणि तिचे दोन्ही पाय कापून दागिने काढून घेतले
इंदूरपासून 35 किमी अंतरावर असलेल्या छोटी खुडैल गावात, 24 वर्षीय राजेश बागरीने एका नातेवाईकाच्या मुलाच्या लग्नात आर्थिक मदत करण्यासाठी आपली आजी जमुना यांच्याकडे चांदीचे दागिने मागितले होते. आजीने हे चांदीचे दागिने आपल्या दोन्ही पायात घातले होते.
हे दागिने राजेश बागरी याला देण्यास आजीने स्पष्टपणे नकार दिला, तेव्हा राजेश बागरीने आपल्या 19 वर्षांचा मित्र विजय ढोली याच्यासोबत आजीच्या हत्येचा कट रचला. 11 फेब्रुवारीला कट रचून आजीच्या जेवणात विषारी पदार्थ मिसळण्यात आले.
जेवल्यानंतर आजी बेशुद्ध पडताच आरोपींनी तिचा गळा आवळून खून केला आणि कुऱ्हाडीने तिचे दोन्ही पाय कापून चांदीचे दागिने काढून घेतल्याचे भागवत सिंह विरडे यांनी सांगितले. तसेच, आरोपींनी महिलेचा मृतदेह तिच्या घराजवळील गोबर गॅस प्लांटमध्ये लपवून ठेवला होता, असे भागवत सिंह विरडे म्हणाले.

0 Comments