google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पाणीपुरवठा उपअभियंता सरपंचांना म्हणतो “तुम्ही माझे मालक आहात काय?”

Breaking News

सांगोला पाणीपुरवठा उपअभियंता सरपंचांना म्हणतो “तुम्ही माझे मालक आहात काय?”

 सांगोला पाणीपुरवठा उपअभियंता सरपंचांना म्हणतो “तुम्ही माझे मालक आहात काय?” 

याबाबत उपअभियंता सुरेश कमळे यांना त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क केला असता कॉल रिसिव्ह करण्यात आला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.

सांगोला/ नाना हालंगडे

सांगोला तालुक्यातील गौडवाडी येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून सुमारे 60 लाख रूपये खर्चून सुमारे दोन वर्षापासून सुरू असलेल्या योजनेची कामे पूर्ण न करताच बिले काढण्यात आल्याचा जाब विचारण्यासाठी सरपंच व उपसरपंच गेले असता अरेरावी करीत, “तुम्ही माझे मालक आहेत का?” अशीच भाषा वापरून कार्यालयातून हाकलून दिले असल्याचा आरोप सरपंच सुजाता माळी व उपसरपंच पोपट गडदे यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. याबाबत उपअभियंता सुरेश कमळे यांना त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क केला असता कॉल रिसिव्ह करण्यात आला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.



सरपंच सुजाता माळी व उपसरपंच पोपट गडदे यांनी सांगितले की, तालुक्यातील गौडवाडी येथे दोन टप्प्यांमध्ये पेयजल योजनेची कामे मंजूर झाली असून कामे न करताच उपअभियंत्याने 90 टक्के कामे केले म्हणून बिले काढली आहेत. यासाठी प्रारंभी पहिला टप्प्यातून 31 लाख रूपये तर दुसऱ्या टप्प्यातून 29 लाख रूपये असे 60 लाख रूपये मंजूर झाले आहेत. यातूनच गेली दोन वर्षापासून गावात कामे सुरू आहेत. अजूनही ती पूर्ण झाली नाहीत.


त्यांच्या म्हणण्यानुसार योजनेच्या टेंडर प्रणालीतील नियमानुसार पाईपलाईनची खोदाई न करता, दर्जेदार पाईप न वापरता व तेही व्यवस्थित न बुजविल्यामुळे ठिकठिकाणी उघडे पडले आहेत. पाणी सुरू होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी पाईप फुटलेल्या आहेत.


असे सर्व केले असतानाही या सर्व बाबींची चोकशी करण्यासाठी सरपंच सुजाता माळी व उपसरपंच पोपट गडदे हे सांगोला येथील कार्यालयातील उपअभियंता सुरेश कमळे यांच्याकडे गेले असता “माझे तुम्ही मालक नाहीत”,असे उद्धट बोलून कुठे जायचे तिकडे जावा, मला काही फरक पडीत नाही. असे म्हणाले असल्याचे सरपंच सुजाता माळी यांनी सांगितले.


सांगोल्याच्या पाणीपुरवठा आणि बांधकाम विभागात सावळा गोंधळ सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. अनेक गावांमध्ये सरपंचच कामे करीत असून,त्यांची कामे ही निकृष्ट दर्जाची केलेली आहेत, असेही बोलले जात आहे.


सांगोल्यात पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता कमळे हे मनमानी कारभार करतात. आमच्या गावातील पेयजल योजनेच्या कामात गुणवत्ताच नाही. जी कामे केली तीही निकृष्ट केलेली आहेत. अशी हे कामे करीत असताना 90 टक्के बिलेही काढलेली आहेत. -पोपट गडदे (उपसरपंच गौडवाडी)

Post a Comment

0 Comments