google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नीरा उजवा कालव्याच्या बंदिस्त पाईपलाईन कामाच्या ६४.१२कोटीच्या निविदा प्रसिद्ध -आमदार शहाजीबापू पाटील

Breaking News

नीरा उजवा कालव्याच्या बंदिस्त पाईपलाईन कामाच्या ६४.१२कोटीच्या निविदा प्रसिद्ध -आमदार शहाजीबापू पाटील

 

नीरा उजवा कालव्याच्या बंदिस्त पाईपलाईन

कामाच्या  ६४.१२कोटीच्या निविदा प्रसिद्ध -आमदार शहाजीबापू पाटील

 सांगोला /प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील अपूर्ण असणाऱ्या शेतीच्या पाण्याच्या योजना पूर्ण करण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतीच्या पाण्याच्या योजना मार्गी लागताना दिसत आहेत 



सांगोला तालुक्यांमध्ये निरा उजवा कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनचे अपूर्ण असणारे काम अनेक वर्षापासून प्रलंबित होते सांगोला शाखा कालवा किमी ८५ते ९९(मूळ कि मी ८५ते १०३) मधील बंदिस्त नलिका वितरण प्रणालीची PDN ची व भाग १च्या लाभ क्षेत्र विकासाची कामे करणे तसेच पाच वर्षाकरता देखभाल दुरुस्ती व परिचलन करणे या कामासाठी २८ कोटी ९४ लक्ष , 


सांगोला शाखा कालवा वितरिका क्र१६ते २७अ व थेट विमोचक ८ते १४ वरील उर्वरित बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचा PDNची व भाग १ च्या लाभ क्षेत्र विकासाची कामे करणे तसेच पाच वर्षाकरता देखभाल दुरुस्ती व परिचलन करणे १७कोटी३९लक्ष, सांगोला शाखा कालवा वितरिका क्र८ब ते १५ व थेट विमोचक १ते ७ वरील उर्वरित बंदिस्त नलिका  वितरण प्रणालीचा PDN ची व भाग १च्या लाभ क्षेत्र विकासाची कामे करणे 


तसेच पाच वर्षाकरता देखभाल दुरुस्ती व परिचलन करणे  १२कोटी१८लक्ष सांगोला शाखा कालवा प्रकल्पांतर्गत सांगोला शाखा कालव्यावरील  कि मी ३०ते ८४ मधील १० कामांचे बांधकामे करणे ३कोटी१२लक्ष, सांगोला शाखा कालवा प्रकल्पांतर्गत नीरा उजवा कालव्यावरील कमान मोरी क्र१४चे मजबुतीकरण करून संधारणाच्या अस्तरीकरण करणे


 २कोटी४७लक्ष या कामांसाठीआमदार शहाजीबापू पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे  पाठपुरावा करून नीरा उजवा कालव्याच्या बंदिस्त पाईपलाईन व विविध कामांसाठी६४.१२कोटी निधी मंजूर करून घेतला आहे या कामांची निविदा प्रसिद्ध  झाली असून लवकरच कामे ही निविदा प्रक्रिया पूर्ण करून सुरु केली जातील 


 या कामांमुळे  सांगोला तालुक्यातील आलेगाव, मेडशिंगी,वाढेगाव,सावे, य मंगेवाडी,अजनाळे, चिणके, अंनकढाळ,वाटंबरे, अकोला, कडलास,  जवळा,या गावातील शेतीच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न  मिटणार असल्याने तेथील शेतकरी आनंद व्यक्त करीत आहेत.२०१९ विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार शहाजीबापू पाटील यांनी मतदारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करीत असल्याने सांगोला तालुक्यातील नागरिक समाधान व्यक्त करीत   आहेत


 यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की यापुढेही सांगोला मतदार संघाच्या विविध विकास कामांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून  भरघोस निधी उपलब्ध केला जाईल

Post a Comment

0 Comments