google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सचिन वाझेने केला मोठा स्फोट, देशमुखांच्या सांगण्यावरूनच केली वसुली !

Breaking News

सचिन वाझेने केला मोठा स्फोट, देशमुखांच्या सांगण्यावरूनच केली वसुली !

 सचिन वाझेने केला मोठा स्फोट, देशमुखांच्या सांगण्यावरूनच केली वसुली !



मुंबई : शंभर कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सचिन वाझे याने भलतेच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला असून अनिल देशमुख यांच्याच सांगण्यावरून आपण वसुली केली आणि त्यांच्याच माणसाकडे ती दिली असा खळबळजनक आरोप वाझे याने केला आहे.  


शंभर कोटींच्या वसुलीप्रकरणी चांदीवाल आयोगाकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीत अनिल देशमुख यांच्या वकिलाने वाझे याची उलट तपासणी केली होती त्यावेळी 'अनिल देशमुख यांनी आपणास पैसे वसुली करण्याचे आदेश दिले नाहीत' असे स्पष्टपणे सांगितले होते. चांदीवाल आयोगाच्या समोर वाझे यांनी तसा जबाब दिला होता पण आता घुमजाव करीत हा जबाब बदलण्यासाठी वाझे याने अर्ज दिला आहे. 


 चांदीवाल आयोगासमोर अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांची चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीत आधीचा दिलेला जबाब बदलण्यासाठी वाझे याने अर्ज केला आहे. 'अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून आपण वसुली केली आहे आणि वसुली केलेले पैसे त्यांच्या लोकांना दिले आहेत' असा आरोप आता वाझे याने केला आहे. चांदिवाल आयोगाने मात्र हा अर्ज फेटाळून लावला आहे.


वाझे याचा अर्ज !


सचिन वाझे याने चांदीवाल आयोगाकडे दिलेल्या अर्जात अनेक प्रकारचे आरोप करण्यात आलेले आहेत. तळोजा तुरुंगात ठेवल्यापासून आपणास वैद्यकीय गरजा पुरविण्यात आल्या न आहीत तसेच गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी प्रचंड मानसिक त्रास दिला आहे. 


अनिल देशमुख हे शक्तिमान व्यक्ती असल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला तरीही त्यांच्या काही लोकांचा माझ्यावर दबाव होता. दबाव टाकून मला मानसिक त्रास दिलेल्या व्यक्तींची नावे मी घेणार नाही कारण मला आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका उत्पन्न होईल. आपणासह परमबीर सिंह यांना देखील खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले आहे. असा दावा सचिन वाझे याने केला आहे.


माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा मोठा आणि खळबळजनक आरोप केला होता आणि त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. अनिल देशमुख यांना मात्र गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर सक्त वसुली संचालनालयाने त्यांच्या सर्व ठिकाणी धाडी टाकल्या होत्या आणि नंतर देशमुख यांना अटक करण्यात आली होती. 


अटक टाळण्यासाठी देशमुख यांनी नेटाचे प्रयत्न केले पण त्यांना न्यायालयात दिलासा मिळाला नाही. अखेर अनेक दिवस नॉट रिचेबल राहिल्यानंतर त्यांना ईडीसमोर हजर व्हावे लागले होते. त्यांनी जामिनासाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत पण न्यायालयाने त्यांना जामीन दिलेला नाही.

Post a Comment

0 Comments