धक्कादायक | विवस्त्र करून अश्लिल कृत्य करण्यास व शेण खाऊ घालण्यास भाग पाडले | दाखवला पिस्तुल व गुप्तीचा धाक
सोलापूर : गावठी पिस्तुल व गुप्तीचा लोकांना धाक दाखवून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली, त्यांना विवस्त्र करून अश्लिल कृत्य करण्यास व शेण खाऊ घालण्यास भाग पाडण्याच्या टोळीस अटक करून एकुण २ लाख २० हजार ५०० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय.
जुना तुळजापुर नाका ते रुपा भवानी मंदिर दरम्यान रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्यांच्या जवळील पिस्तुलाचा धाक दाखवून लोकांना मारहाण व लुटमार करीत आहेत. अशी बातमी पोलिसांना मिळाली याबाबत पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुररी यांना माहिती देऊन गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदारांसह रुपा भवानी मंदिराकडून जुना तुळजापुर नाकाकडे
जाणाऱ्या सर्विस रोडच्या कोपऱ्यावर सापळा रचुन इसम नामे सागर अरुण कांबळे वय २२ वर्ष व्यवसाय मजूरी राहणार न्यु बुधवार पेठ, भिम विजय चौक, सोलापुर २) बुध्दभूषन नागसेन नागटिळक, वय २६ वर्ष व्यवसाय मंडप व्यवसाय रा नं. ४१/१८३ न्यु बुधवार पेठ, आंबेडकर उद्यानजवळ सोलापुर
३) सतीश ऊर्फ बाबुला अर्जुन गायकवाड वय २५ वर्ष व्यवसाय ड्रायव्हर रा.घर नं.१२६ मिलिंद नगर, बुधवार पेठ, सोलापूर ४) अक्षय प्रकाश थोरात वय २६ वर्ष व्यवसाय ड्रायव्हर, रा. ४८/८, मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, न्यु बुधवार पेठ, विश्वदीप चौक, सोलापुर यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात
एक गावठी पिस्तुल, एक धारधार गुप्ती, चार मोबाईल फोन व दोन मोटारसायकल मिळून आल्या. मिळालेल्या मोबाईल व्हि.डी.ओ. दोन पंचासमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये हे चार ही आरोपी त्यांच्याकडील गावठी पिस्तुलचा व धारधार गुप्तीचा रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना धाक दाखवून करून त्यांना मारहाण व दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी देत
होते एवढेच नाही तर त्यांना विवस्त्र करून, त्यांना हस्तमैथुन व अनैसगिक संभोग करण्यास भाग पाडून त्यांना शेण खाऊ घालण्यास भाग पाडणे असे अश्लिल कृत्य करण्यास भाग पाडणे त्यांचे मोबाईलमध्ये व्हि.डी.ओ. रेकॉडर्डींग करून ते आपापसात व्हाट्सएपमध्ये प्रसारीत केल्याचे दिसुन आले.
या चारही इसमांविरुध्द जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुर. नं. ५८/२०२२ भा.द.वि. कलम २९२,५०६(२) भारतीय हत्यार कायदा कलम ३,४,२५ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६७(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा तपास पोनि विजयालक्ष्मी कुर्री या करीत आहेत.

0 Comments