google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे आद्यगुरू लहुजी वस्ताद साळवे व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी साजरी

Breaking News

विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे आद्यगुरू लहुजी वस्ताद साळवे व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी साजरी

 विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे आद्यगुरू लहुजी वस्ताद साळवे व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी साजरी

                  विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे आद्यगुरू लहुजी वस्ताद साळवे व वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली . कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाचे अध्यक्ष मा. दामोदर साठे, उद्योगपती इंजिनीयर भीमराव बंडगर, प्रा. डॉ. तानाजी फुलारी, प्रा.डॉ. मनोज कुमार माने. प्रा. अशोक कांबळे. यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


                कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दामोदर साठे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्पष्ट केले की, लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य व कर्तुत्व हे खऱ्या अर्थाने खूप मोठे आहे. त्यांच्या कार्याला बंदिस्त करून ठेवता येणार नाही .ब्रिटिश कालीन लढा ,छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये लागणारे शस्त्रसाठा, व सैनिकांना दिले जाणारे प्रशिक्षण यामध्ये वस्ताद असणारे लहुजी वस्ताद साळवे हे होय .परंतु त्यांचे कार्य दुर्लक्षित राहिले आहे.


 कशी खंत त्यांनी व्यक्त केले. आजच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लहुजी वस्ताद साळवे यांचे धाडशी , शूर व करारी कार्य यांची ओळख करून देणे ही खऱ्या अर्थाने  काळाची गरज आहे. त्यांचे जीवन चरित्र विद्यार्थ्यांना सांगणे गरजेचे आहे. तर क्रांतिवीर वासुदेव फडके यांचे देशाविषयीचे असलेले कार्य व कर्तुत्व हे निश्चितच महत्त्वाचे आहे.


               कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मनोज कुमार माने यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना स्पष्ट केले की, वासुदेव बळवंत फडके व आद्यगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जीवनचरित्राचा उपस्थितांना परिचय करून दिला. लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य हे कसे दुर्लक्षित व उपेक्षित राहिले आहे याच्या विषयी खंत व्यक्त करून त्यांचे व्यक्तिमत्व व जीवन कार्य विद्यार्थ्यांसमोर आणणे किती महत्वाचे आहे हे स्पष्ट केले. विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेतील खूप महत्त्वाचा घटक आहे त्याला जागरूक करणे, 


मार्गदर्शन करणे व आदर्शवादी व्यक्तीमत्त्वांची चरित्र वाचण्यास प्रवृत्त करणे हे आपले महत्त्वाचे काम आहे. तेव्हा आदर्शवादी व्यक्तिमत्त्वांच्या जयंती व पुण्यतिथी यातून आपण विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देतो. लहुजी वस्ताद साळवे व वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांना अभिवादन करून त्यांचे कार्य व विचार आत्मसात करु असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.


         कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. दिपक रिटे यांनी केले तर आभार प्रा. अशोक कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. अतुल बाबर, प्रा. डॉ. शुद्धोधन कदम, प्रा . संतोष भोसले ,धनंजय गायकवाड, सौ. विमल माने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments