सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे घराचा दरवाजा अर्धवट उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
घरातील पत्र्याच्या पेटीत ठेवलेले दीड तोळ्याचे गंठण, तीन ग्रॅम काळातील झुबे, दोन ग्रॅम सोन्याचे फुल,
सहा हजार रुपयांचे जोडवे आणि 10 हजार रुपयांची रोकड असा सुमारे 96 हजार रुपयांचा मुद्देमाल रात्रीत लंपास केला. ही घटना रविवार 13 फेब्रुवारी रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शेतकरी संजय व्हनमाने यांनी रविवारी सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
फिर्यादी संजय व्हनमाने हे नेहमी घराचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवून झोपतात. याचीच संधी साधून चोरट्याने पेटीतील दागिने आणि रोख रक्कम पळवली. पेटी ज्वारीच्या शेतात फेकून दिली. याबाबत संजय व्हनमाने यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

0 Comments