google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 18 हजार 246 थकबाकीदार वीजग्राहकांना महावितरणकडून नोटिसा : - आनंद पवार

Breaking News

18 हजार 246 थकबाकीदार वीजग्राहकांना महावितरणकडून नोटिसा : - आनंद पवार

 18 हजार 246 थकबाकीदार वीजग्राहकांना महावितरणकडून नोटिसा : - आनंद पवार

 चालू व थकित वीज बिल भरा अन्यथा ; वीज पुरवठा खंडित केला जाईल महावितरणचा इशारा

सांगोला / प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील घरगुती , व्यापारी व औद्योगिक अशा एकूण 18 हजार 246 ग्राहकांकडे 2 कोटी 86 लाख 15 हजार 357 रुपये वीजबिल थकीत आहे . सदरची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरण कंपनीकडून वेळोवेळी वायरमन व वसुली अधिकारी यांच्यामार्फत पाठपुरावा केला आहे . 


तरीही विज बिल जमा न झालेल्या थकबाकीदार 18 हजार 246 ग्राहकांना विज बिल भरण्यासंदर्भात महावितरणकडून नोटिसा बजावण्यात आले आहेत .

नोटिसा मधील मुदत संपण्यापूर्वीच वीज ग्राहकांनी आपले चालू व थकित रक्कम भरुन महावितरण कार्यालयास सहकार्य करावे अन्यथा , वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाईल 


असा इशारा महावितरणचे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार यांनी दिला आहे . महावितरण विभागाचे मार्च अखेरचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी थकबाकीदार विज ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत लेखी व मोबाईलवर देखील नोटीस

बजाविण्यात आल्या आहेत . तसेच थकबाकीदार शासकीय कार्यालयांना देखील अधिकृत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत . महावितरण विभागाकडून विजबिल वसुली व दुरुस्तीसाठी पथके तयार केली आहेत 


. त्यामुळे आपली थकित रक्कम व चालू बिल न भरल्यास निश्चितपणे वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाणार आहे . सर्व वीज ग्राहकांनी आपले थकीत व चालू बिल भरून सहकार्य करावे . आणी महावितरणचे वीज बिल वेळेत भरावे असे आवाहन

उपकार्यकारी अभियंता आनंद पवार यांनी केले आहे . सांगोला तालुक्यातील 17 हजार 589 घरगुती , औद्योगिक व व्यापारी तर 483 स्ट्रीट लाईट व 174 पाणीपुरवठा असे एकूण 18 हजार 246 ग्राहकांना वीजपुरवठा सुरू आहे .


 सदर ग्राहकांकडे मार्चअखेर 2 कोटी 86 लाख 15 हजार 357 रुपये इतकी थकबाकी आहे . तसेच गेल्या 6 महिन्यापासून सांगोला तालुक्यातील घरगुती , व्यापारी , औद्योगिक अशा 1700 ग्रहकांचे वीज बिल थकीत आहे . यामध्ये 68 लाख 49 हजार 694 रुपयेवीज बिल देणे आहे . तसेच गेल्या 3 महिन्यापासून 6 हजार 687 ग्राहकापोटी 1 कोटी 65 लाख 48 हजार 386 रुपये ग्राहकांची विज बिलाची थकबाकी आहे . 


तरी घरगुती , व्यापारी , औद्योगिक अशा एकूण 18 हजार 94 ग्राहकांना मोबाईल द्वारे नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत . तरी ग्राहकांनी नोटीसीचा कालावधी संपण्याच्या आत विज बिल भरून वीज वितरण कंपनीस सहकार्य करावे अन्यथा नोटिसीचा कालावधी संपल्यानंतर वीज वितरण कंपनीकडून वीज तोडण्याचीकारवाई करण्यात येणार आहे . तरी ग्राहकांनी वीज बिल भरून वीज वितरण कंपनीस सहकार्य करावे 


व होणारी कार्यवाही टाळावी . घरगुती , औद्योगिक , व्यवसायिक उपभोक्ता ग्राहकांकडील 2 कोटी 86 लाख 15 हजार 357 रुपयांची थकबाकी वसूल करून मार्चअखेर प्रत्येक ग्राहकाची थकबाकी शून्य करण्याचे उद्दिष्ट महावितरण विभागाने धोरण अवलंबले आहे . तरी महावितरणचे विज बिल भरून सर्व वीज ग्राहकांनी सहकार्य करावे . अन्यथा थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल असे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार यांनी सांगितले आहे

Post a Comment

0 Comments