धक्कादायक ! अंथरुणाला खिळलेल्या ८७ वर्षीय महिलेवर बलात्कार
दुपारी घऱात महिला एकटीच असताना एक व्यक्ती घरात गॅस कनेक्शन चेक करण्याचा बहाणा सांगून घरात शिरली.
दिल्लीत एका ८७ वर्षीय महिलेनं तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. महिलेच्या कुटुंबियांनी असा आरोप केला आहे की, पोलिसांनी केस दाखल करून घेण्यास नकार दिला. संबंधित महिला रुग्णशय्येवर आहे. त्यांचा एक पाय अधू असून त्या मुलीसोबत राहतात. दुसरीकडे महिलेच्या कुटुंबियांनी केलेला आरोप पोलिसांनी फेटाळून लावला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पश्चिम दिल्लीतील टिळक नगर भागात ८७ वर्षीय महिला तिच्या ६५ वर्षाच्या मुलीसोबत राहते. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याचा दावा महिलेनं केला आहे. तर या प्रकरणी गुन्हा नोंदवून घेण्यास पोलिसांनी नकार दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
यावर अतिरिक्त पोलिस आयुक्त चिन्मय बिस्वाल यांनी सांगितलं की, कुटुंबियांनी पोलिसांवर केलेला आरोप निराधार आहे. पोलिसांचे पथक या प्रकरणी तपास करत असून आरोपींना अटक केली जाईल.पीडितेच्या नातवाने याबद्दल माहिती देताना सांगितलं की, दुपारी साडेबाराच्या सुमारास त्या एकट्याच घरात होत्या.
त्यांची मुलगी तेव्हा बाहेरून दरवाजा बंद करून जवळच कामासाठी गेल्या होत्या. आज्जीला चालू शकत नाही, ती अंथरुणालाच खिळून आहे. दुपारी घऱात महिला एकटीच असताना एक व्यक्ती घरात गॅस कनेक्शन चेक करण्याचा बहाणा सांगून घरात शिरली. त्या व्यक्तीला आजीने तिच्या मुलीला फोन करायला सांगितलं मात्र व्यक्तीने कॉल न करता तो फोन स्विच ऑफ केला.
पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, बलात्कार करणाऱ्या व्यक्तीचं वय ३० च्या आसपास असावं. ती व्यक्ती दारु प्यायली होती. तेव्हा महिलेनं किंचाळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या व्यक्तीने मारहाण करत बलात्कार केल्याचा आरोप ८७ वर्षीय महिलेनं केला आहे.
महिलेनं आता बलात्काराचा आरोप केला असला तरी सुरुवातीला फक्त मोबाईल चोरी झाल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे मोबाइल चोरीचा गुन्हा दाखल केला होता. सोमवारी महिलेनं बलात्कार झाल्याचं सांगितलं. त्यानतंर आता एफआयआरमध्ये बलात्कार प्रकरणी कलम लावण्यात आले आहे.

0 Comments