नॅशनल दलित मूव्हमेन्ट फॉर जस्टीस या सामाजिक संघटनेची पंढरपूर तालुका कार्यकारणी जाहीर....
दि 12 -2-2022 रोजी पंढरपूर येथे नॅशनल दलित मूव्हमेन्ट फॉर जस्टीस या सामाजिक संघटनेच्या तालुका कार्यकारणीची निवड प्रक्रिया या संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मा. पंकजकुमार काटे जिल्हाउपाध्यक्ष मा. धनाजी शिवपालक यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडली
या मध्ये ता. अध्यक्ष म्हणून शेवते येथील सामाजिक कार्यकर्ते गोविंदा सावंत याची निवड झाली तर ता. उपाध्यक्ष म्हणून मौजे बडीशेगावचे विशाल ननवरे यांची तर सचिवपदी तारापूरचे बळीराम वाघमारे याची तर ता. संघटकपदी अविनाश ताकतोडे यांची तर कार्याध्यक्षपदी वासुदेव साठे तर प्रसिद्धी प्रमुख परमेश्वर गेजगे यांची तर ता. समन्व्यक पदी लखन सावंत तर ता. संपर्कप्रमुख पदी महेश कांबळे यांची निवड झाली तर कायदेशीर सल्लागार म्हणून ऍड. अर्चना मस्के यांची निवड झाली
यावेळी या नुतन पदाधिकाऱ्यांनी विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले यावेळी या नूतन पदाधिकारी यांना जिल्हाध्यक्ष मा. पंकजकुमार काटे उपाध्यक्ष मा.धनाजी शिवपालक एन. डी. एम. जे चे पंढरपूर तालुक्याचे युवा नेते मा. रोहित एकमल्ली यांनी संघटनेची ध्येय धोरणे समजावून सांगून येणाऱ्या काळात संघटनेचे राज्याचे महासचिव मा. ऍड केवल उके साहेब व राज्याचे राज्यसचिव तसेच
महाराष्ट्राचे आंबेडकरी चळवळीचे लोकप्रिय लोकनेते मा.वैभवजी गिते साहेब यांच्या मार्गदर्शना खाली कशा पद्धतीने रचनात्मक अभ्यासपूर्ण काम करायचे हे समजावून सांगितले यावेळी नुतन पदाधिकारी यांनीही सत्काराला उत्तर देताना संघटनाचे विचार समाजाच्या तळागाळातील लोकांच्या पर्यन्त पोहचवणार आहे तसेच या संघटनेच्या माध्यमातून दीन दलित शोषित पीडित यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली
यावेळी या निवडीच्या कार्यक्रमाला पंढरपूर तालुक्यातील असंख्य भीमसैनिक उपस्थित होते
शेवटी आभार प्रदर्शन ऍड संजय नवगिरे पाटील यांनी केले...

0 Comments