google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लवकरच बस हवेत उडताना दिसणार, “या” भाजप नेत्याची घोषणा

Breaking News

लवकरच बस हवेत उडताना दिसणार, “या” भाजप नेत्याची घोषणा

 लवकरच बस हवेत उडताना दिसणार, “या” भाजप नेत्याची घोषणा 

ज्येष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच हवेत उडणाऱ्या बस पहायला मिळतील अशी घोषणा केली आहे.


 एवढेच नव्हे तर हवाई बसचा डीपीआर तयार असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नितीन गडकरी यांनी प्रयागराजमधील सभेला उपस्थिती लावली. यावेळी बोलताना त्यांनी हे आश्वासन दिले आहे. ग़डकरींनी यावेळी बोलताना सी प्लेन, रिंग रोड, सहा पदरी पुलासह अनेक आश्वासने दिली होती.


“माझ्याकडे आता रोपवे, केबल कार आली आहे. आता मी केशवजींना सांगितले आहे की, हवेत चालणाऱ्या बसचाही डीपीआर तयार करत आहोत. प्रयागराजमध्ये रस्त्याच्या वर हवेत चालणारी बस चालवू. तुम्ही रस्ता तयार करुन घ्या. माझ्या विभागाकडे पैसा आहे. माझ्याकडे पैशांची कोणतीही कमतरता नाही. मी करोडोंमध्येच चर्चा करतो,” असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले. “प्रयागराजमध्ये सी प्लेन सेवा सुरु करण्याचे आपले स्वप्न आहे, 


ज्यामुळे मी दिल्लीवरुन उड्डाण करुन संगमच्या पाण्यातून प्रयागराजमध्ये लँण्डिंग करु शकतो. लवकरच हेदेखील सत्यात उतरणार आहे,” असेही गडकरी यांनी आश्वासने दिलेली आहेत.नितीन गडकरींनी यावेळी हायड्रोजन इंधनाचा वापर वाहनांमध्ये केला जाईल असे  सांगितले. राज्यात मुबलक ऊस उपलब्ध होता, त्याच्या सहाय्याने इथेनॉलचा वापर वाहनातील इंधन म्हणून केला जाईल. 


इथेनॉलच्या वापरामुळे वाहनासाठी लागणाऱ्या इंधनाची किंमत कमी होऊन १०० रुपये लीटर पेट्रोलच्या तुलनेत ६८ वर येईल असा दावा गडकरींनी केला.नितीन गडकरी यांनी यावेळी विकासाची गती कायम ठेवण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा भाजपाचे सरकार आणण्याचे आवाहन केले आहे. उत्तर प्रदेशचे नशीब बदलण्यासाठी भाजपाचे सरकार गरजेचे आहे असे गडकरी म्हणाले.

Post a Comment

0 Comments