google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापुरात आजपासून तीन दिवस "रिपोस BETA मोबाईल पेट्रोल पंप रोड शो" ; काय आहे ही संकल्पना वाचा नक्की

Breaking News

सोलापुरात आजपासून तीन दिवस "रिपोस BETA मोबाईल पेट्रोल पंप रोड शो" ; काय आहे ही संकल्पना वाचा नक्की

 सोलापुरात आजपासून तीन दिवस "रिपोस BETA मोबाईल पेट्रोल पंप रोड शो" ; काय आहे ही संकल्पना वाचा नक्की

सोलापुर : इंधन ऊर्जा वितरणातील अग्रगण्य असलेल्या रिपॉस एनर्जीने रिपोस २.०, BETA मोबाईल पेट्रोल पंप लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. नवीन क्रांतिकारी मोबाईल पेट्रोल पंप कॉर्पोरेट्स आणि व्यक्तींना व्यावसायिक हेतूंसाठी इंधन वितरीत करेल. स्वारस्य असलेल्या भागधारकांना रिअल-टाइम अनुभव देण्यासाठी, रिपॉस स्टार्टअप देशभरात रोड शो करत आहे. या देशव्यापी मोहिमेची सुरुवात डिसेंबर २०२१ मध्ये झाली. BETA मोबाईल पेट्रोल पंप महाराष्ट्रातील  सोलापुर  शहरात 17 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2022 या कालावधीत दाखल होत आहे.


संभाव्य ग्राहकांना रिअल-टाइम अनुभव देण्यासाठी रतन टाटा समर्थित रिपॉस शहरात BETA सादर करेल. BETA शहरातील विविध पेट्रोल पंप आउटलेटवर प्रदर्शित केले जाईल.


BETA मोबाईल पेट्रोल पंप हे प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करणारे, धोरणात्मकरित्या तयार केलेले मॉडेल आहे, मग ते विद्यमान असोत किंवा नवीन पेट्रोल पंप मालक असोत. यामुळे विद्यमान पेट्रोल पंप डीलर्सना त्यांचा स्वतःचा व्यवसाय कमीत कमी गुंतवणुकीत वाढवण्यास मदत होईल, कारण ते आता त्यांची पोहोच वाढवू शकतील आणि सर्व क्षेत्रातील वाढत्या मागणी जलद गतीने पूर्ण करू शकतील.


■ लॉन्चवर भाष्य करताना, चेतन वाळुंज, (Chetan Walunj) सह-संस्थापक, रिपॉस एनर्जी, नमूद करतात, “आम्ही आमच्या आतापर्यंतच्या प्रवासात वाढीच्या पुढील स्तरावर जाण्यासाठी उत्सुक आहोत. येत्या काही वर्षांमध्ये इंधनाची मागणी वाढणार आहे, आणि आपण अपव्यय टाळण्यासाठी कार्यक्षम वितरण सेवांसह तयार असणे आवश्यक आहे. BETA मॉडेल हे सर्व पैलूंमध्ये एक मजबूत फ्रेमवर्क तयार करण्यासाठी आमच्या अगणित तासांच्या प्रयत्न, समर्पण आणि गुंतवणुकीचा परिणाम आहे आणि आम्ही हे सुनिश्चित केले आहे कि संस्थेने एक मजबूत पाया तयार केला आहे आणि आता उर्जा वितरण क्रांतिची वेळ आली आहे.


रिपॉस BETA मोबाईल पेट्रोल पंप लॉन्च करणे म्हणजे एका मोबाईल क्लिकवर डोरस्टेप डिझेल डिलिव्हरीमध्ये प्रवेश मिळवणे. ग्राहकाच्या विशिष्ट गरजेनुसार रिपॉस अँपद्वारे ऑर्डर दिली जाऊ शकते. ही क्रांतिकारी सेवा सोयीस्कर, वापरकर्त्यासाठी अनुकूल आहे आणि इंधन वितरणाची कार्यक्षमता आणि पेट्रोल पंप व्यवसायाला एक नवीन उभारी देईल.

Post a Comment

0 Comments