google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गरीब मुलाशी लग्न केलं म्हणून तरुणीची आत्महत्या !

Breaking News

गरीब मुलाशी लग्न केलं म्हणून तरुणीची आत्महत्या !

 गरीब मुलाशी लग्न केलं म्हणून तरुणीची आत्महत्या !



नागपूर : आपल्या सगळ्या मैत्रिणींचे लग्न श्रीमंत घरात झाले परंतु  आपला विवाह केवळ गरीब मुलाशी लग्न करण्यात आला म्हणून तरुणीने आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


लग्नाच्या गाठी देवाघरी बांधलेल्या असतात असे आपल्याकडे म्हटले जाते. कुणाचे लग्न कधी कुणाशी जुळून येईल हे कुणालाच माहित नसते पण अलीकडे मुलींच्या अपेक्षा वाढू लागल्याने अनेक गैरप्रकार वाढीला लागलेले आहेत. काही मुली लग्नापूर्वी अवास्तव स्वप्नं रंगवतात आणि विवाहानंतर त्याची पूर्ती नाही झाली की घरातील सुख नाहीसे होते, घटस्फोट होतो किंवा अन्य काही अनुचित प्रकार होत असतात. 


'दिल्या घरी तू सुखी रहा' ही केवळ आता कल्पनाच उरली आहे. मुलीचे वडील मुलीच्या लग्नाआधी सगळी चौकशी करूनच मुलीचा विवाह ठरवत असतो पण मुलींच्या मनातील सुप्त अपेक्षा आणि रंगवलेली अवास्तव स्वप्ने दोन कुटुंबाचे सुख हिरावून घेत असते याचा अनुभव पुन्हा एकदा आला असून विवाहितेने थेट आत्महत्या करण्याचेच पाउल उचलले आहे. 


केवळ गरीब घरातील मुलाशी लग्न लावून दिले म्हणून नवविवाहितेने गळफास घेऊन आपल्या जीवनाचा शेवट केला असल्याची बाब समोर आली. जलालखेडा येथे अवघ्या २५ वर्षे वयाच्या अश्विनी रणमले या तरुणीने हे टोकाचे पाउल उचलले.


 यवतमाळ जिल्ह्यातील घानमुख या गावच्या हरिदास रणमले या तरुणाशी २९ डिसेंबर २०२१ रोजी लग्न झाले होते. हरिदास यांना २०२० साली जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाची नोकरी लागली होती. वाढोणा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या हरिदास यांना ते शिक्षण सेवक असल्याने त्यांना दरमहा ६ हजार रुपये मानधन मिळते.


 घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे नैराश्यात असलेली आश्विनी हिने अचानक आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शसनास आले. नुकतेच लग्न झालेल्या आश्विनीच्या आत्महत्येने सगळेच हादरले. पती हरिदास हे शाळेत गेले होते आणि घरी कुणी नसल्याचा फायदा घेत तिने गळफास लावून आपले जीवन संपवले.  


अश्विनी ही वनविभागात सेवा केलेल्या बाबुराव बरमटेके यांची मुलगी होती. तिच्या माहेरची आर्थिक परिस्थिती सधन होती.  तिच्या घरातील अन्य सदस्य उच्च शिक्षित आणि मोठ्या पगाराच्या नोकरीवर आहेत.


 तिचे लग्न मात्र केवळ सहा हजार रुपये मानधन असलेल्या एका शिक्षण सेवकासोबत झाल्याने ती आतून अस्वस्थ होती आणि याच नैराश्याने तिला ग्रासलेले होते याची साक्ष देणारी एक चिट्ठी पोलिसांना आढळून आली आहे. 


 त्यामुळे अशा नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे. पोलिसांनी घराची तपासणी केली असता त्यांना एक डायरी आढळून आली आणि या डायरीत आढळलेल्या माहितीवरून या आत्महत्येच्या कारणाचा उलगडा होऊ लागला आहे.  


हरिदास यांच्याशी विवाह झाल्याचे तिला मान्य नव्हते आणि त्यामुळे ती प्रचंड निराश होती हे या डायरीतील मजकुरातून दिसून येत आहे. "ज्या दिवशी माझा विवाह झाला तो दिवस माझ्या जीवनातील काळा दिवस होता,  माझे एका गरीब घरात लग्न करून देण्यात आले आहे. 


 माझ्या सर्व मैत्रिणी माझ्यापेक्षा गरीब आहेत पण त्यांचे लग्न श्रीमंत घरी आई उच्चशिक्षित मुलाशी झाले आहे. माझे सर्व कुटुंब उच्चशिक्षित असून माझे लग्न अशा गरीब घरात करण्यात आले आहे" असे या डायरील लिहिले असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे.

Post a Comment

0 Comments