सोलापूर : शिवसेनेला युती तुटण्याचा अनुभव नवीन नाही ; आमची स्वबळाची तयारी
सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाच्या वतीने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा जाहीर करण्यात आला आहे. त्याच्यावर प्रशासनाने पंधरा दिवसात हरकती मागवल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून शहरातील राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रभाग रचने वरून चर्चा सुरू झाली आहे.
राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षाची महाविकास आघाडीची सत्ता आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीत ही आघाडी होणार का... की हे सर्व पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार याबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्याशी या प्रकरणी चर्चा केली असता
शिवसेनेला महानगरपालिकेच्या निवडणुकीत युती तुटण्याचा अनुभव काही नवीन नाही. त्यामुळे आम्ही 38 प्रभागांमध्ये 113 जागेवर उमेदवार तयार ठेवले आहेत.आमची बूथ यंत्रणा सक्षम आहे, आघाडीचा निर्णय मात्र पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील अशी भूमिका बरडे यांनी व्यक्त केली.
0 Comments