सोलापूर शहर व ग्रामीणच्या 7 जणांना पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती
सोलापूर : पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राज्यातील 453 अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या केल्या आहेत. अनेक दिवसांपासून रखडलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक ते पोलीस निरीक्षक या पदोन्नत्या बुधवारी जाहीर करण्यात आल्या.
पदोन्नतीसाठी न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या न्यायालयाच्या निकालानुसार या पदोन्नती देण्यात आले आहेत.सोलापूर शहर येथील निलकंठ राठोड यांचीही पदोन्नती झाली आहे. सोलापूर शहर येथील दीपक बरडे यांची पुणे ग्रामीण येथे,
अमोल मिसाळ यांची पुणे सीआयडी, निलकंठ राठोड यांची पुणे येथे पदोन्नती झाली आहेत.सोलापूर ग्रामीणचे राजेंद्र मगदुम यांची नागपूर येथे, देवेंद्र राठोड यांची मुंबई शहर येथे पदोन्नती झाली आहे. विकास देशमुख हे पुणे शहर येथून सोलापूर शहर येथे बदलून येणार आहेत.
सांगली येथून दत्तात्रय कोळेकर यांच्यासोबतच गजाजन बनसोडे हे पिंपरी चिंचवड येथून, रायगड येथून सुशांत वरळे, उस्मानाबाद येथून संदीप मोदे, संग्राम थोरात, प्रवीणकुमार कांबळे, अश्विनी गोड हे पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे येणार आहेत.
यापुर्वी सोलापूर शहरात कर्तव्य बजावलेल्या आणि सध्या सातार्यातील कोयनानगर पोलीस स्टेशनचे चंद्रकांत माळी यांची लोहमार्ग मुंबई येथे पदोन्नती झाली आहे. राजेंद्र उशीरे यांची नागपूर येथे तसेच नितीन खाडगे यांची मुंबई येथे पदोन्नती झाली आहे.
0 Comments