google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आमदार प्रणिती शिंदेंच्या मागणीला यश ; जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले आदेश

Breaking News

आमदार प्रणिती शिंदेंच्या मागणीला यश ; जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले आदेश

 आमदार प्रणिती शिंदेंच्या मागणीला यश ; जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले आदेश



सोलापूर :  आमदार प्रणिती शिंदे यांची जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमवेत बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सोलापूर शहरातील गीता नगर फायनल प्लॉट क्र. 32,33,34 व 34 अ येथील प्लॉट धारकांचे प्लॉट बिगरशेती नोंद होवून 


सातबारा मिळण्याबाबत व इतर विविध विषयांसंदर्भात चर्चा झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, सहाय्यक संचालक नगररचना चलवदे, उत्तर तहसिलदार जयवंत पाटील,  नगर भुमापन अधिकारी राठोड व  इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.


या बैठकीमध्ये सोलापूर शहरातील गीता नगर तेथील प्लॉट नं. 32,33,34 मधील नगरे जसे माधव नगर, विजय नगर, गीता नगर, कमटम नगर इ. वसाहती गेल्या 30-40 वर्षापूर्वी लेआऊट मंजूर करून नागरीकांना विकण्यात आलेली असून बहुसंख्य नागरीक तेथे वास्तव्यास आहे.


 या नगरातील प्लॉट सिटी रेकॉर्डवर शेती अशी नोंद असल्यामुळे नागरीकांना सदर प्लॉटची खरेदी, विक्री अथवा कोणताही व्यवहार करताना अडचणी येत आहेत सदर फायनल प्लॉट नं. 32,33,34 चे लेआऊट झाल्यानंतर आपोआप बिनशेती अशी नोंद सिटी सर्व्हेच्या मिळकत पत्रिकेवर होणे आवश्यक होते.


 परंतू तशी नोंद न झाल्याने येथील नागरीकांना अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे सदर टी.पी.1, फायनल प्लॉट नं. 32,33,34 व 34 अ वरील सर्व प्लॉट धारकांच्या मिळकत पत्रिकेवरील शेती अशी चुकीची झालेली नोंद दुरुस्ती करून बिनशेती अशी नोंद करण्यात यावी ही मागणी करण्यात आली.


यासंदर्भात  जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तहसिलदार, उत्तर सोलापूर यांना तात्काळ फायनल प्लॉट नं. 32,33,34 व 34 अ चे 42 ब अंतर्गत अर्ज भरुन घेऊन बिनशेती करून द्यावे व नगरभुमापन अधिकारी यांनी स्वतंत्र मालमत्ता पत्रक तयार करून सदर प्लॉटधारकांना देण्यात यावे


 असे आदेश दिले. यावेळी शंकर चौगुले, गोविंदराज एकबोटे, मुदोळकर, लक्ष्मण विटकर, बाळू क्षिरसागर, रविंद्र बनुगंटी, व्यंकटेश गालपल्ली, भिक्षापती परकीपंडला व गीता नगर येथील रहिवासी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments