सोलापूर : घरमालकांना द्यावी लागणार भाडेकरूंची माहिती ; हरिष बैजल पोलीस आयुक्त, सोलापूर शहर
सोलापूर : विध्वसंक किंवा समाजविघातक लोक (घटक) शहरातील निवासी भागात लपून बसू शकतात, अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यांच्यामुळे शांतता भंग अथवा खासगी, सार्वजनिक मालमत्तेला इजा होण्याची शक्यता आहे.त्यामुळे शहरातील प्रत्येक घरमालकांनी त्यांच्या जागेत अथवा मालमत्तेत भाड्याने राहणाऱ्यांची माहिती संबंधित पोलिस ठाण्याला द्यावी, असे आदेश पोलिस आयुक्त हरिष बैजल यांनी काढले आहेत.
घरमालकांनी त्यांच्या मालमत्तेची खरेदी- व्रिकी झाल्यानंतर अथवा भाड्याने दिल्यानंतर समोरील व्यक्ती कोण आहे, याचीही माहिती पोलिसांना देणे बंधनकारक असल्याचे आदेशात नमूद केले आहे. त्यावेळी त्या व्यक्तीचे नाव, त्याचे राष्ट्रीयत्व, पासपोर्ट, व्हिसा क्रमांक श्रेणी, ठिकाण, नोंदणीचे ठिकाण अशी कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे. तसेच तो व्यक्ती शहरात कोणत्या कामानिमित्त राहायला आला आहे,
याचे कारणही पोलिसांना द्यावे लागणार आहे. हा आदेश ५ एप्रिलपर्यंत लागू राहणार असून या कालावधीत संबंधित घरमालकांनी शहरातील त्यांच्या परिसरातील पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, असे आवाहनही पोलिस आयुक्तांनी त्यांच्या आदेशातून केले आहे. शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहील, हा त्यामागील हेतू आहे.
पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार...
घरमालकाने त्याची मालमत्ता भाड्याने दिली असल्यास भाडेकरूची माहिती पोलिस ठाण्याला द्यावी
शहरातील जागा, जमिनीची खरेदी-विक्री झाल्यास समोरील व्यक्ती कोण, याचीही माहिती देणे आवश्यक
घर, मालमत्ता स्थानिक अथवा परदेशी नागरिकाला दिली असल्यास त्याची संपूर्ण माहिती पोलिसांना द्यावी
शहरात तो कोणत्या कारणास्तव राहायला आला आहे, याचीही माहिती संबंधित पोलिस ठाण्याला कळवावी
विध्वसंक, समाजविघातक लोक निवासी भागात लपून बसतात. त्यामुळे शांतता भंग होण्याची व खासगी, सार्वजनिक मालमत्तेला धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे घरमालक व भाडेकरूंची तपासणी आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक घरमालकांनी त्यांच्या जागेवर किंवा इमारतीत राहणाऱ्या भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्यात जमा करावी.
- हरिष बैजल,
पोलीस आयुक्त, सोलापूर शहर

0 Comments