google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकाकडून बलात्कार रिक्षाचे भाडे नसल्याचा फायदा घेत बलात्कार केले आहे.

Breaking News

अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकाकडून बलात्कार रिक्षाचे भाडे नसल्याचा फायदा घेत बलात्कार केले आहे.

 अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकाकडून बलात्कार रिक्षाचे भाडे नसल्याचा फायदा घेत बलात्कार केले आहे. 


पुण्यात खळबळजनक घटना घडली आहे. येथे एका रिक्षा चालकाने अल्पवयीन मुलीवर रिक्षाचे भाडे नसल्याचा फायदा घेत बलात्कार केले आहे. 



तर दुसऱ्या दोन आरोपींनी अल्पवयीन मुलगी आणि तिच्या मैत्रिणीवर बळजबरी करत विनय भंग केला.या प्रकरणी एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. 



मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आरोपी सागर बचुटे(24), विकीकुमार(23), अशोक वीरबहादूर (23) यांना अटक केली आहे. 



पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिची मैत्रीण आरोपी सागरच्या रिक्षातून जात असताना त्यांच्या कडे भाड्याचे पैसे नसल्याचे समजले. त्यांनी आरोपीला आमच्याकडे भाड्याचे पैसे नाहीत असे सांगितले. 



याचा गैरफायदा घेत आरोपी सागर सदर पीडितेला झाडीत घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. नंतर तो तिला सोडून पसार झाला. घडलेल्या घटना पूर्वी या मुलींना त्यांच्या ओळखीतील विकीकुमार आणि अशोक भेटले होते.



 त्यांनी देखील या मुलींची छेड काढून विनयभंग केला. घटनेनंतर मुलींनी हडपसर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात तक्रार केली. पोलिसांनी त्या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली असून अधिक तपास करत आहे.

Post a Comment

0 Comments