google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 प्रचंड उत्साह व कार्यकर्त्यांच्या गराड्यात मा. आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

Breaking News

प्रचंड उत्साह व कार्यकर्त्यांच्या गराड्यात मा. आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

 प्रचंड उत्साह व कार्यकर्त्यांच्या गराड्यात मा. आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव


सांगोला : तालुका प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा. विधानपरिषद सदस्य मा.आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांचा 60 वा वाढदिवस कार्यकर्त्यांच्या उच्चांकी गर्दीत पार पडला. 



आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी सांगोला शहर, तालुका मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस, अकलूज, मोहोळ व संपूर्ण जिल्ह्यातून तसेच मुंबई, पुणेसह राज्यभरातून कार्यकर्त्यांनी शुक्रवार दि. 07 जानेवारी रोजी प्रचंड गर्दी केली होती. 



जवळा अँगो सांगोला येथील कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीमुळे मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या कार्यालयात अक्षरशः एखाद्या यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. प्रमुख्याने यामध्ये शहर व तालुक्यातील तरुणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या नेत्याला शुभेच्छा दिल्या. 



दरवर्षी मा. आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांसाठी पदाधिकाऱ्यांसाठी एक उत्सवच असतो. या दिवशी आपल्या या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी 



सांगोला तालुक्यातील खेडोपाड्यातील सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्ते पदाधिकारी, हितचिंतक, नातेवाईक, महिला तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वृत्तपत्र क्षेत्रातील बड्या हस्ती येत असतात. यावर्षी संपूर्ण राज्यभरात पडलेला ओला दुष्काळ व ओमिक्रोन या विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे यंदाचा वाढदिवस 



अनावश्यक खर्च न करता सामाजिक उपक्रम हाती घेऊन करावा असे मा. आम. दीपक आबा साळुंखे पाटील यांनी स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील व ह.भ.प. शारदादेवी साळुंखे-पाटील यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपण्याचे आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले होते.



कार्यकर्त्यांनीही आपल्या नेत्याच्या सूचनेचे तंतोतंत पालन करून गावोगावी वाड्या-वस्त्यांवर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी निराधार बालकांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप, महिलांना साड्या, व गरजूंना थंडीपासून संरक्षणासाठी ब्लँकेटचे वाटप, 



विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आपल्या नेत्याचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. प्रामुख्याने जवळा येथील गयाळी बंधूंनी दरवर्षीप्रमाणे यंदाही आबांच्या जन्मदिनी आपल्या चहाच्या स्टॉलवर आठवडा बाजारात येणाऱ्या तब्बल 02 ते 03 हजार लोकांना मोफत चहाचे वाटप केले. 



सांगोला शहर व तालुक्यात कुठेही पोस्टरबाजी डिजिटल फ्लेक्स न लावता या खर्चातून समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्याची सर्वांना सूचना देण्यात आली होती दरम्यान आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सकाळी 07 वा. पासून कार्यकर्त्यांनी रांगा लावल्या होत्या. 



अत्यंत उत्साहपूर्ण व आनंदाच्या वातावरणात सर्व कार्यकर्त्यांनी जवळा व सांगोला येथील संपर्क कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून मा.आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या



कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा हीच आपली उर्जा

कार्यकर्त्यांकडून मिळणाऱ्या शुभेच्छा या राजकीय व सामाजिक जीवनात काम करताना नेहमीच प्रेरणादायी ठरतात. यानिमित्ताने आपले कार्यकर्ते आपल्यावर किती निस्सीम व निरपेक्ष भावनेने प्रेम करतात याची जाणीव होते. कार्यकर्त्यांचे हे प्रेम पाहून आपणास पुढील वाटचाल करण्यास अधिक बळ आणि ऊर्जा मिळते याच बळाच्या किंवा ऊर्जेच्या जोरावर आपण कार्यकर्त्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढत राहू – 


मा.आम दिपकआबा साळुंखे-पाटील

Post a Comment

0 Comments