google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शमा पवार ब्रेकींग | जिल्हा प्रशासनाचा सोलापूरकरांसाठी महत्वाचा निर्णय |शासकीय कार्यालयात आता याची आवश्यक नाही

Breaking News

शमा पवार ब्रेकींग | जिल्हा प्रशासनाचा सोलापूरकरांसाठी महत्वाचा निर्णय |शासकीय कार्यालयात आता याची आवश्यक नाही

 शमा पवार ब्रेकींग | जिल्हा प्रशासनाचा सोलापूरकरांसाठी महत्वाचा निर्णय |शासकीय कार्यालयात आता याची आवश्यक नाही



सोलापूर :- विविध प्रकारच्या दाखल्यासाठी तसेच विविध कामकाजासाठी शासकीय कार्यालय व न्यायालयासमोर करावयाच्या प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र देण्याची आवश्यकता नाही. असे निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी सांगितले आहे.



 उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये तसेच राज्य शासनाने 2004 मध्ये शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.   विविध प्रकारचे दाखले घेण्यासाठी  शासकीय कार्यालय व न्यायालयासमोर करावयाच्या प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपर वर प्रतिज्ञापत्र सादर करण्याची आवश्यकता नाही .



 शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्र सादर करताना नागरिकांकडून मुद्रांक शुल्काची मागणी करू नये असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिले आहेत.

Post a Comment

0 Comments