महुद येथे भरदिवसा घरफोडी
महुद / प्रतिनिधी भरदिवसा चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे १ लाख ६१ हजार रुपयांचा ऐवज चोरून निल्याची घटना महुद येथे घडली आहे . महुद पंढरपूर रस्त्यालगत मुलाणी वस्ती येते राहणाऱ्या सचिन काकासाहेब काशीद यांच्या घरी ही चोरी झाली आहे . दुपारी ३ वाजता काशीद यांच्या घरातील सर्वजण घराला कुलूप लावून घराजवळच असलेल्या शेतात शेतीच्या कामासाठी गेले होते . शेतातील काम आटोपून सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ते घरी परत आले .
तेव्हा त्यांना दरवाजे , कुलूप तोडलेले व दरवाजा उघडा दिसला . घरातील कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे आयरिंग , सोन्याच्या रिंगा , सोन्याची अंगठी , सोन्याचे गंठण , सोन्याचा करंडा , यासह रोख ५० हजार रुपये असा एकूण १ लाख ६१ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी दुपारी तीन ते पाच वाजण्याच्या दरम्यान चोरून नेला . याबाबत सचिन काशीद यांनी सांगोला पोलिसात फिर्याद दिली आहे . घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे .

0 Comments