सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी भाजपावर भारी
सोलापूर (प्रशांत कटारे) : जिल्ह्यात झालेल्या पाच नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपवर भारी पडल्याचे दिसून आले. 85 जागांपैकी 23 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या तर पंधरा जागा भाजपला मिळाल्या, माढा नगरपंचायतवर काँग्रेसने वर्चस्व राखत जिल्ह्यात 13 जागा मिळवल्या शिवसेनेला दोन तर माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते-पाटलांची दादागिरी दिसून आली. मोहिते पाटील गटाने नगरपालिका आपल्या ताब्यात घेत माळशिरस तालुक्यातील वर्चस्व सिद्ध केले.
सोलापूर जिल्ह्यातील नव्याने झालेल्या वैराग, महाळुंग श्रीपुर, नातेपुते तसेच माढा माळशिरस या पाच नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे आल्याने 20 जागेवरील निवडणुक थांबली होती मात्र ओबीसीच्या आरक्षण रद्द करून त्या जागेवर सर्वसाधारण गटातून पुन्हा निवडणूक झाली
त्याची मतमोजणी बुधवार 19 जानेवारी रोजी झाली. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी प्रतिष्ठेची केलेल्या वैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादीच्या एकट्या निरंजन भुमकर यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 13 जागा जिंकत एक हाती वर्चस्व प्रस्थापित केले ज्येष्ठ नेते दिलीप सोपल यांच्या गटाला एकही जागा मिळाली नाही. राऊत यांना केवळ 4 जागा मिळाल्या.
माढा नगरपंचायतीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसच्या दादासाहेब साठे आणि मीनल साठे या दाम्पत्याने आपली सत्ता कायम ठेवत राष्ट्रवादी आणि शिवसेनेला धूळ चारली आहे . गेल्या नगरपंचायत निवडणुकीत दादा साठे हे भाजपमध्ये असतानाही त्यांचीच सत्ता माढा नगरपंचायतवर होती . यावेळी साठे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर देखील १७ पैकी १२ जागांवर विजय मिळवत त्यांनी आपली पकड अधिक मजबूत केली आहे .
राष्ट्रवादीचे जेष्ठ आमदार बबनदादा शिंदे यांच्या गटाला दोन तर शिवसेनेचे शिवाजी सावंत गटाला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले आहे . एका ठिकाणी अपक्षाचा विजय झाला आहे . या नगरपंचायत निवडणुकीत सर्वात चुरशीची लढत माजी नगराध्यक्ष मीनल साठे आणि त्यांचे पुतणे शिवसेना शहर प्रमुख शंभू साठे यांच्यात झाली . मात्र मीनल साठे यांनी आपला पुतण्या शंभू साठे याचा दणदणीत पराभव करीत सहज विजय मिळविला .
माळशिरस तालुक्यातील नातेपुते या नगरपंचायत निवडणुकीत मोहिते पाटील यांचेच दोन गट एकमेकांच्या विरोधात लढले होते . यात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या माळशिरस नगर विकास आघाडीने निर्विवाद बहुमत मिळवत नातेपुते नगरपंचायत ताब्यात घेतली आहे . त्यांना विरोध करणारे भानुदास राऊत हे देखील मोहिते पाटील गटाचे असून यांच्या नागरी विकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला आहे . माळशिरस नगर विकास आघाडीने 17 पैकी 11 जागा जिंकून एकहाती वर्चस्व राखले. विरोधात 17 पैकी सहा जागा अपक्षांनी जिंकल्या.
माळशिरस तालुक्यातील म्हाळुंग जिल्हा परिषद गट विसर्जित होऊन त्याठिकाणी म्हाळुंग-श्रीपुर अशी एकत्रित नगरपंचायत झाली. या भागात मोहिते पाटील गटाचे वर्चस्व मात्र हा भाग माढा विधानसभा मतदारसंघातील आल्याने या ठिकाणी आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण ताकद लावली होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा मिळाल्या काँग्रेस पक्षाला एक भारतीय जनता पक्षाला एक जागा मिळाली तर मोहिते पाटील गटाने आघाडी केलेल्या अपक्षांनी एकत्रित मिळून सत्ता आणली, अपक्ष आघाडी काठावर पास झाली त्यांना 17 पैकी 9 जागा मिळाल्या.
माळशिरस तालुक्यातील म्हाळुंग जिल्हा परिषद गट विसर्जित होऊन त्याठिकाणी म्हाळुंग-श्रीपुर अशी एकत्रित नगरपंचायत झाली. या भागात मोहिते पाटील गटाचे वर्चस्व मात्र हा भाग माढा विधानसभा मतदारसंघातील आल्याने या ठिकाणी आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण ताकद लावली होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा मिळाल्या काँग्रेस पक्षाला एक भारतीय जनता पक्षाला एक जागा मिळाली तर मोहिते पाटील गटाने आघाडी केलेल्या अपक्षांनी एकत्रित मिळून सत्ता आणली, अपक्ष आघाडी काठावर पास झाली त्यांना 17 पैकी 9 जागा मिळाल्या.
मतमोजणीमध्ये सर्वात जास्त चुरस माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत दिसत होती , येथे मिलिंद कुलकर्णी आप्पासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 17 जागांवर भाजपने निवडणूक लढवली होती .
त्यांना तुकाराम देशमुख यांनी राष्ट्रवादीकडून आव्हान देत रंगत आणली होती . याचवेळी माजी सरपंच माणिकबापू वाघमोडे यांनीही महाराष्ट्र विकास आघाडीचे पॅनल उभे करीत तिरंगी लढत निर्माण केली . मात्र आजच्या मतमोजणीत भाजपने १० जागा जिंकत माळशिरस नगरपंचायतीवर निर्विवाद बहुमत सिद्ध केले . येथे राष्ट्रवादीचे आघाडी प्रमुख तुकाराम देशमुख यांचा विजय देशमुख नावाच्या भाजपच्या सध्या युवा कार्यकर्त्यांनी पराभव केला .
या निवडणुकीत मनसे तालुकाप्रमुख यांच्या पत्नी रेश्मा टेळे या महाराष्ट्र विकास आघाडीतून विजयी झाले . या निवडणुकीत राष्ट्रवादीला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले तर माणिकबापू वाघमोडे यांच्या महाराष्ट्र विकास आघाडीला २ जागी विजय मिळविता आला . तीन जागांवर अपक्षांनी विजय मिळविला .

0 Comments