विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी साजरी
विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे लाल बहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. रघुनाथराव फुले उपप्राचार्य प्रा. विजय कुमार घाडगे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. रघुनाथ राव फुले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना लालबहादूर शास्त्री यांचे जीवन कार्य व राजकीय जीवनावरती प्रकाश टाकून विद्यार्थ्यांचे उदबोधन करण्याचा प्रयत्न केला तर उपप्राचार्य विजयकुमार घाडगे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की विद्यार्थ्यांनी समाजातील आदर्शवादी व्यक्तींचा विचार आत्मसात करून व त्यांच्या जगण्याची प्रेरणा घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला पाहिजे ह्या आदर्शवादी व्यक्तिमत्त्वांच्या त्यांच्या विचारांच्या देवानेच आपण जगले पाहिजे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. डॉ दीपक रिटे यांनी केले तर आभार प्रा. अशोकराव कांबळे यांनी मानले. कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग ठेवून पार पाडण्यात आला.
0 Comments