google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 “मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो म्हणणारे- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष-नाना पटोले यांचा मीडिया समोर सत्य पुरावा दाखल”..

Breaking News

“मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो म्हणणारे- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष-नाना पटोले यांचा मीडिया समोर सत्य पुरावा दाखल”..

 “मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो म्हणणारे- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष-नाना पटोले यांचा मीडिया समोर सत्य पुरावा दाखल”.. 


पाठीमागे काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. त्यात मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असं म्हंटल्याचं दिसून आलं होतं. सोशल मीडियात ही क्लीप व्हायरल होताच भाजपा आक्रमक झाला. भाजपानं राज्यभरात आंदोलन करत नाना पटोले यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. भंडारा-गोंदियात असा कोणता मोदी नावाचा गावगुंड आहे की नाही यासाठी प्रसारमाध्यमांनी शोधमोहीमही राबवली नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतच असा उल्लेख केल्याचा दावा भाजपाने केला. त्याचसोबत या प्रकरणानं राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस नेत्यांची नाचक्की झाली होती. अखेर नाना पटोलेंनी माध्यमांसमोर केलेला खुलासा खरा करुन दाखवल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.


यासाठी आता सविस्तर व्हिडीओ समोर आला                आहे.https://fb.watch/aGxhBglHno/


मा.नाना पटोलेंच्या विधानानंतर राज्यभरात भाजपानं पटोलेंविरोधात आंदोलनं केले होते. मात्र आपण एका गाव गुंड मोदीविरोधात ते वक्तव्य केले होते असा पवित्रा नाना पटोलेंनी घेतला होता. मग हा गावगुंड कोण? अशी चर्चा सगळीकडे सुरु झाली होती.


भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलसह अनेकानी

राज्यात याबाबत आंदोलन केली होती. यांनी गावगुंड मोदी दाखवावा असं आव्हान केले होते. त्यानंतर आता पटोलेंनी ज्या गावगुंड मोदीचा उल्लेख केला त्याबद्दल माहिती समोर आली आहे. 


राज्यभरात हे प्रकरण चांगलंच गाजत असताना नाना पटोलेंनी आज नागपुरात त्यांचे वकील सतीश उके यांच्याकरवी आपला दावा खरा करुन दाखवण्यासाठी उमेश उर्फ मोदी प्रेमदास घडे याला प्रसारमाध्यमांसमोर हजर केलं आहे आता यापुढं काय होत हे पाहणं महत्वाच ठरेल.

Post a Comment

0 Comments