मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेवर येण्या आधी शंभर टक्के वीज बील माफीचा शब्द पाळावा अन्यथा राजीनामा द्यावा :- प्रभाकर देशमुख
भाजप-शिवसेनेच्या काळात अजितदादा म्हणाले होते तेलंगणाला मोफत वीज दिली जाते आता तर दादा तुम्ही सत्तेवर आहात...
दोन वर्षांपूर्वी सत्तेवर येण्याची महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आम्हाला सत्ता द्या तुमचे शंभर टक्के वीज बिल माफ करू अशी तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते तो दिलेला शब्द पाळला नाही त्यामुळे शंभर टक्के वीज बिल माफ करावे अन्यथा राजीनामा द्यावा अशी मागणी तमाम शेतकऱ्यांच्या वतीने प्रभाकर देशमुख यांनी केलेली आहे.
देशमुख पुढे बोलताना म्हणाले राज्यकर्त्यांवर वीज बिल माफ करतो असे तुम्ही आश्वासन देऊन शेतकऱ्यांना वाईट सवय लावलेली आहे या थकीत वीज बिलला तुम्हीच जबाबदार आहात गेल्या दोन महिन्यापासून शेतकऱ्यांच्या विद्युत पुरवठा थांबवुन पीक व बागा उद्ध्वस्त केलेलया आहेत शेतकरी आयुष्यातून उठला आहे महावितरणने नोटीस न देता विद्युत पुरवठा बंद करून बनावट वसुली सुरू केली आहे मुक्या जनावरांचे लाईट नसल्यामुळे पिण्याच्या पाण्यावाचुन हाल होत आहेत बागा आणि पिके उध्वस्त झाले आहेत
मंत्र्यांनो व महावितरणच्या अधिकाऱ्यांनो शेतकरी जिवंत राहिला तर ज्वारीची भाकरी आणि गव्हाची चपाती वांगी आणि टोमॅटोची ची भाजी खाऊन जीवन जगू शकता याची जाणीव ठेवावी त्यामुळे मोहोळ तालुक्यात बरोबर सोलापूर जिल्ह्यातला विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करावा अन्यथा महावितरणच्या अधिकाऱ्यांना कुलूप लाऊन कोंडून टाकू
वेळप्रसंगी कपडे फाडून धिंड काढू कायद्याने नोटीस काढा मुदत द्या आणि विद्युत पुरवठा सुरळीत दया डीपी जळलेला दोन दिवसात द्या आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवा असेही बोलताना देशमुख यांनी ठणकावून सांगितले या आशयाचे लेखी निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व महावितरणचे कार्यकारी संचालक अधीक्षक अभियंता सोलापूर यांना दिलेल आहे
यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख नितीन काळे युवक जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोरे चंद्रकांत निकम कुमार गोडसे रघु चव्हाण बाळासाहेब नागणे कीशोर दत्तु अविकाका गायकवाड बलभिम माळी लहू माळी इत्यादी असंख्य शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते

0 Comments