धक्कादायक स्कॉर्पिओ गाडी झाडाला आदळली
दक्षिण सोलापूर रविवारी पहाटे साधारण पावणे चार च्या सुमारास सोलापुरातील तिघांचा अपघातात मृत्यू झाला आहे.गाडी झाडाला धडकल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला. सदर घटना ही सोलापूर विजयपूर रोडवर तेरामैल औराद परिसरात घडली.
विजयपूर महामार्गवरील तेरा मैल याठिकाणी पहाटे पावणे चारच्या सुमारास एम एच 13 झेड 9909 (MH 13 Z 9909) स्कॉर्पिओ गाडीतून औराद ते सोलापूर येथे येत असताना तेरा मैल जवळ,वकील वस्ती येथे झाडाला गाडी धडकल्याने तिघेही जखमी झाले.
उपचारासाठी त्यांचा मित्र संभाजी जुगदार याने त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येत आहे.
किशोर अण्णाराव भोसले (वय वर्षे 45) राहणार सळई मारुती, उत्तर कसबा सोलापूर, नितीन भगवान भांगे (वय 32) रा. निराळे वस्ती सोलापूर, व्यंकटेश राम म्हेत्रे (वय 45) राहणार मोदी सोलापूर अशी मृतांची नावे आहेत.राकेश हुच्चे हा गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
सोलापुर विजपुर रोड हा मृत्यूचा सापळा झाल्याचं चित्र आहे. अनेक अपघात या नव्याने होत असलेल्या रस्त्यावर घडत आहेत तसेच लातूर जवळील बायपास हा तर धोकादायक असल्याची चर्चा या भागातील नागरिकांमधून होत आहे.
0 Comments