google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बार्शीचा "बिग बुल"विशाल फटेचा हा अंडरवर्ल्ड डॉन होता आदर्श | शनिवारी दिवसभरात काय घडले

Breaking News

बार्शीचा "बिग बुल"विशाल फटेचा हा अंडरवर्ल्ड डॉन होता आदर्श | शनिवारी दिवसभरात काय घडले

 बार्शीचा "बिग बुल"विशाल फटेचा हा अंडरवर्ल्ड डॉन होता आदर्श | शनिवारी दिवसभरात काय घडले



बार्शीतील 'फटे स्कॅम' प्रकरणात पहिली अटक झाली आहे.  मुख्य आरोपी विशाल फटेचे वडील आणि भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं.  मुख्य आरोपी विशाल फटे याचे वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे यांना पोलिसांनी पकडलं. मध्यरात्री सांगोला येथून स्थानिक गुन्हे शाखेने या दोघांना ताब्यात घेतलं. कोट्यवधीच्या फसवणूक प्रकरणी विशाल फटेसोबत परिवारातील 4 सदस्य देखील आरोपी आहेत. त्यापैकी दोघे जण आता ताब्यात आले आहेत. मुख्य आरोपी विशाल फटे अद्यापही फरार आहे. अंबादास फटे, भाऊ वैभव फटे या दोघांना बार्शी न्यायालयानं पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 


गुन्हा दाखल होताना 6 तक्रारदारांचे जवळपास 5 कोटी 63 लाखांची फसवणूक झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र परवा रात्रीपर्य़ंत तक्रारदार वाढल्याने हा आकडा जवळपास 12 कोटींवर पोहोचल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच गुन्ह्याची व्याप्ती पाहता तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. सुरुवातीला तपास पोलिस निरीक्षकांकडे होता मात्र आता हा तपास डीवायएसपी दर्जाचे अधिकारी करत आहे. या बाबतीत विशेष तपास पथक देखील नेमलं जाण्याची शक्यता आहे. 



मागील आठवड्याभर केवळ चर्चा सुरु असलेल्या बार्शीतल्या स्कॅमप्रकरणी काल गुन्हा दाखल झाला होता. आरोपी विशाल फटे याचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या दीपक आंबरे यानेच शेवटी या प्रकरणात फिर्याद दिली . विशालने बार्शीतल्या कित्येक लोकांना फसवल्याचं बोललं जात असताना त्याने मित्रांना देखील सोडलेलं नाही. दीपक आंबरे यांच्यासह अनेक जवळच्या मित्रांना देखील विशाल फटेने कोट्यवधींची फसवणूक केली आहे.


दीपक यांच्या फिर्यादीनंतर बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रारींचा पाऊस पडतोय. गुन्हा दाखल होत असताना केवळ 6 लोकांनी यासंदर्भात तक्रार दिली होती. त्यानंतर मात्र एका दिवसात आणखी 40 लोकांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. 



सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात सध्या 'फटे'ची चर्चा आहे.  विशाल फटेनं बार्शी आणि सोलापुरातील अनेकांना कोट्यवधींचा चुना लावला असून सध्या तो फरार आहे. या प्रकरणात बार्शीतील बड्या नेत्यांसह काही अधिकारी व  प्रतिष्ठीत मंडळींना मोठा फटका बसला आहे, अशी चर्चा सुरु आहे तर अनेक गोरगरीबांना देखील विशाल फटेनं चुना लावला आहे. 


विशाल फटे हा मुळचा मंगळवेढा तालुक्यातील आहे. त्याचे वडील बार्शीतील एका महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून ते बार्शीतच वास्तव्यास होते. बार्शीतील शिवाजी महाविद्यालयासमोर साई नेट कॅफे नावाने तो नेट कॅफे चालवत होता. इथूनच तो छोट्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक देखील करत होता. 2019 साली फिर्यादी दीपक आंबरे हे विशाल याच्या नेट कॅफेमध्ये पीक विम्याचे फॉर्म भरण्यासाठी गेले होते. तिथे त्यांची ओळख विशाल सोबत झाली. नंतर ही मैत्री अधिक घट्ट होत गेली. 



विशालने दीपक यांना शेअर मार्केटबद्दल सांगितले. आणि त्यांच्याकडून पहिल्यांदा 70 हजार रुपये घेतले. पहिल्याच महिन्यात 30 हजार रुपये वाढ करुन एक लाख रुपयांचा परतावा विशालने दीपक यांना दिला. यामुळे त्यांचा विश्वास वाढत गेला. दीपक यांनी स्वत: सह आपल्या परिवारातील सदस्यांचे, नातेवाईकांचे पैसे देखील विशालकडे गुंतवले.


जवळपास 5 कोटी रुपयांची गुंतवणूक फिर्यादी दीपक यांनी विशालकडे केली होती. दीपक प्रमाणेच बार्शीतील अनेकांनी विशालकडे पैसे गुंतवलेले होते. मात्र 9 जानेवारी रोजी विशाल आपल्या परिवारासह पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी सोलापूर ग्रामीण दलाचे तीन ते चार पथक विविध ठिकाणी रवाना करण्यात आले आहे. 



विशाल फटे विरुद्ध गुन्हा नोंद होताच पोलिसांनी उपळाई रोडवर असलेल्या त्याच्या कार्य़ालयाची आणि बार्शीतील घराची झडती घेतली. झडतीमध्ये पोलिसांनी विविध कागदपत्रे, चेकबुक जप्त केल्याची माहिती आहे. सोबतच विशालचे कार्य़ालय आणि घर देखील पोलिसांनी आता सील आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी विविध बँकेतील त्याची खाती पत्र देऊन गोठवण्यात आली आहे.


गेल्या पाच दिवसापासून चर्चेत असलेल्या शेअर बाजार लिंक्ड कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी विशाल अंबादास फटे याच्यावर गुन्हा (crime news) दाखल झालाय.



या विशालने जगातील सर्वात श्रीमंत माफिया ‘डॉन पाब्लो एस्कोबारला आदर्श मानलय. जिंदगी असावी तर पाब्लोसारखी असे तो नेहमी म्हणायचा. (Don Pablo Escobar) विसाव्या शतकातील जगातील सर्वात श्रीमंत आणि विलासी माफिया डॉन पाब्लो एस्कोबार हा बिगबुल (bigbull) विशाल फटेचा आदर्श होता. तो नेहमी पाब्लोचे व्हिडीओ  पहायचा आणि जिंदगी असावी तर पाब्लो सारखी, असे म्हणायचा. पाब्लोनेही त्याच्या आयुष्यात पैसे कमविताना कशाचाही विधिनिषेध बाळगला नाही. फक्त पैसे कमविणे हेच त्याचे ध्येय होते. 



त्याने अवैध व्यवसायातून आयुष्यभर इतके पैसे कमविले की 1989 मध्ये त्याला जगातील सातव्या क्रमाकांची श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आले होते. त्याला आलिशान बंगले, गाड्या आणि उंची राहणीमानाचा शौक होता. पाब्लोच्या ऐषोआरामाचे अनेक किस्से प्रचलीत आहेत. एकदा प्रवासात असताना थंडीत उब मिळविण्यासाठी त्याने 2 मिलियन डॉलरची म्हणजेच भारतीय चलनात 15 कोटी रुपयांच्या नोटांची शेकोटी पेटवली होती. हाच पाब्लो विशालच्या डोक्यात सदैव थैमान घालत होता. हातात पैसा खेळू लागल्यानंतर त्याच्याही राहणीमानात बदल झाला होता. त्याच्या वागण्या बोलण्यातून नवश्रीमंती डोकावू लागली होती.

Post a Comment

0 Comments