google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ॲक्शन मोड! मंगळवेढा शहराच्या सुरक्षिततेसाठी पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांचे मोठं विधान; म्हणाल्या...

Breaking News

ॲक्शन मोड! मंगळवेढा शहराच्या सुरक्षिततेसाठी पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांचे मोठं विधान; म्हणाल्या...

 ॲक्शन मोड! मंगळवेढा शहराच्या सुरक्षिततेसाठी पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांचे मोठं विधान; म्हणाल्या...


मंगळवेढा शहर व परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ग्राम सुरक्षा दलाच्या धर्तीवर नागरी सुरक्षा दल कार्यक्षम असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मंगळवेढयाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांनी केले.


उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, मंगळवेढा नगरपरिषद व मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त बैठकीत त्या बोलत होत्या.


राजश्री पाटील म्हणाल्या, ग्रामीण भागात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यरत झाल्यापासून अनेक गुन्हे रोखू शकलो. मंगळवेढा शहरातील नागरी सुरक्षा दलासाठी मंगळवेढा नगरपरिषदेने पुढाकार घेवून यंत्रणा राबविल्यास पोलिस प्रशासनाच्यावतीने सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल.



सध्या मंगळवेढा शहरातील चौका चौकामध्ये चांगल्या दर्जाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची आवश्यकता आहे. मोठे व्यापारी पेट्रोल पंपचालक, हॉस्पिटले , शाळा कॉलेज मंदिरे याठिकाणीही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी त्या त्या विभाग प्रमुखांनी पुढाकार घेतला पाहिजे.



नागरी सुरक्षा कार्यरत झाल्यास एका फोनवरून आपण होणारा गुन्हा रोखू शकतो. तसेच आरोपीस पकडू शकतो. शासनाने सुरू केलेली ही यंत्रणा जनतेसाठी अतिशय उपयुक्त ठरत असून यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


या बैठकीस मंगळवेढा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, कर निरीक्षक विनायक साळुंखे, मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे संस्थापक दिगंबर भगरे, माजी अध्यक्ष अॅड . दत्तात्रय तोडकरी, मंगळवेढा टाईम चे संपादक समाधान फुगारे, प्रमोद बिनवडे, प्रसाद कसबे आदि उपस्थित होते

Post a Comment

0 Comments