google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 क्रूरतेचा कळस ! बापाने पोटच्या मुलीवरच सतत केला बलात्कार; क्रूर बापाला न्यायालयाने सुनावली शिक्षा

Breaking News

क्रूरतेचा कळस ! बापाने पोटच्या मुलीवरच सतत केला बलात्कार; क्रूर बापाला न्यायालयाने सुनावली शिक्षा

 क्रूरतेचा कळस ! बापाने पोटच्या मुलीवरच सतत केला बलात्कार; क्रूर बापाला न्यायालयाने सुनावली शिक्षा


पुणे : मूळ उत्तरप्रदेश चा असणारा ४३ वर्षाचा आरोपी हा पत्नीचा मृत्यू आल्यानंतर दोन्ही मुलांसहित पुण्यात  स्थायिक झाला होता. तो पुण्यातील एका बांधकाम साईटवर  काम करत होता.


आरोपीला एक मुलगा आणि १ मुलगी आहे. पुण्यात स्थायिक झाल्यानंतर पत्नीच्या मृत्यूनंतर क्रूर बापाने  स्वतःच्या मुलीवरच वारंवार बलात्कार  करण्यास सुरुवात केली .


स्वतः मुलीने पोलीस स्टेशन  मध्ये जात याबाबत पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास करता आरोपी बापाला अटक  केली होती. या प्रकरणाबाबत न्यायालयात  सुनावणी सुरु होत.

विशेष न्यायाधीश (पॉक्सो) के.के जहागीरदार  यांनी क्रूर बापाला मरेपर्यंत जन्मठेप आणि 50 हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.


दंड न भरल्यास 5 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा  भोगावी लागणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.


काय आहे प्रकरण ?

पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी त्याच्या दोन मुलांना घेऊन पुण्यात राहायला आला होता. तो बांधकाम साईटवर काम करायचा. त्याने स्वतःच्याच मुलीवर वारंवार बलात्कार केला.


मुलीला सहन न झाल्याने स्वतःच पोलीस स्टेशन गाठले आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. आरोपी हा मुलीने तक्रार केल्याच्या गोदर ३ वर्षे सतत तिझावर बलात्कार करत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले.


आरोपीने मुलीला जर कोणाला सांगितले तर तिझा भावाला मारून टाकेन अशी धमकी दिली होती. मुलीच्या बापाने भावासमोरही हे कृत्य केल्याचे मुलीने सांगितले आहे.


या प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्त्या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात  पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा  दाखल करण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments