जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे नवे आदेश सोलापूरच्या ग्रामीण भागात राहणार आता असे निर्बंध
ज्याअर्थी, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र दि. १४ मार्च, २०२० अन्वये कोरोना विषाणू (कोव्हीड- १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमीत करणेत आलेली आहे. आणि त्याबाबतची नियमावली प्रसिद्ध केली असून जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हीड १९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.
ज्याअर्थी, ओमीयक्रॉन कॉविड १९ व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने व पुढील काळात त्याचा प्रसार जास्त होण्याची शक्यता असल्याने शासनाकडील वाचा क्र. ५ मधील दि.०८.०१.२०२२ आदेशानुसार कोविड १९ विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध (प्रतिबंध) करण्यासाठ रोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संपूर्ण राज्यात कडक निर्बंध जारी करण्याचे आदेशीत करण्यात आले आहेत.
त्याअर्थी, मी मिलिंद शंभरकर जिल्हादंडाधिकारी, सोलापूर, फोनदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (३) व अपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार आंगोयांन कोरोना (कोव्हिड १९) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडील प्राप्त निर्देशास अनुसरून सोलापूर जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय सोलापूर ची हद वगळून) दि.१०.०१.२०२२ चे रात्री ००.०० पासून खालीलप्रमाणे निर्बंध लागू राहतील, लागु केलेले निर्बंध क्षेत्र
नागरीकांचे बाहेर फिरणे
पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या समूहाला बाहेर फिरण्यासाठी पहाटे ०५ ते रात्री ९९ पर्यंत मनाई असेल. २. पाच किंवा त्याहून जास्त लोकांच्या समूहाला अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरण्यासाठी रात्री ११ पर्यंत ते पहाटे ०५ •वाजेपर्यंत मनाई असेल.
शासकीय कार्यालये
१. महत्त्वाच्या कामासाठी कार्यालय प्रमुखाच्या स्पष्ट व लेखी परवानगीविना कार्यालयात येण्यास आगंतुकांवर मनाई असेल.. २. कार्यालय प्रमुखांनी नागरीकांसाठी व्हिडियो कॉन्फरन्सिंग सुविधेची व्यवस्था करावी. ३. बाहेरून येणा-या लोकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीची व्यवस्था करण्यात यावी. ४. कार्यालय प्रमुख गरजेनुसार वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत कार्यालयीन वेळेत कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणा-या कर्मचा यांची संख्या कमी करणे तसेच गरजेनुसार कार्यालयीन कामकाजाच्या बदलाचाही तसेच कामाच्या वेळा ठरवू शकतील.
५. कार्यालय प्रमुखांनी कोविड विरोधी वागणुकोचे काटेकोर पालन केले जाईल, याची काळजी घ्यावी. ६. कार्यालय प्रमुखांनी थर्मल स्कॅनर्स, हॅड सॅनिटायझर्स उपलब्ध करून घ्यावेत.
खाजगी कार्यालये
१. कार्यालय व्यवस्थापनाने वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत कामाकाजाच्या वेळा आळीपाळीने निश्चित कराव्यात. कार्यालयात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत, याचीही दक्षता घ्यावी तसेच कर्मचा-यांसाठी वेळांमध्ये बदल करण्याचाही विचार करतील. तसेच कार्यालये २४ तास सुरू ठेवून टप्याटप्याने काम करण्याबाबत नियोजन करावे.
कार्यालयीन कामकाजाच्या वेळा असामान्य असतील आणि त्यासाठी प्रवास करणे अत्यावश्यक असेल तर अत्यावश्यक कामासाठी ओळखपत्र दाखवून परवानगी मिळवता येऊ शकेल. अशाप्रकारचा निर्णय घेताना महिला कर्मचा-यांची सुरक्षितता आणि सोयीचा विचार करणे बंधनकारक राहील,
२. लसीकरण पूर्ण केलेले कर्मचारीच कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील. लसीकरण पूर्ण न झालेल्या कर्मचा-यांना लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावेत.
३. कार्यालय व्यवस्थापनाने सर्व कर्मचारी सर्वकाळ कोविडविरोधी वागणुकीचे तंतोतंत पालन करतील याची दक्षता घ्यावी.
४. कार्यालय व्यवस्थापनाने थर्मल स्कॅनर्स, हँड सॅनिटायझर्स उपलब्ध करून द्यावेत. जास्तीत जास्त ५० व्यक्तीस परवानगी राहील.
अंत्यविधी
जास्तीत जास्त २० व्यक्ती परवानगी राहील.
सामाजिक, धार्मिक, | सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम
जास्तीत जास्त ५० व्यक्तो परवानगी राहोल.
शाळा आणि महाविद्यालय, कोचिंग क्लासेस
खाली दिलेल्या बाबी वगळता १५ फेब्रुवारी पर्यत बंद राहतील,
१. विविध शैक्षणिक बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्या राबवायचे उपक्रम २. प्रशासकीय कामकाज आणि शिक्षकांनी अध्यापन विद्यार्थ्याव्यतिरीक्त करायचे कामकाज,
३. शालेय शिक्षण विभाग, कोशल्य आणि उद्योजकता विकास विभाग, तांत्रिक आणि उच्च शिक्षण विभाग, वैदयकीय शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग आणि अन्य वैधानिक प्राधिकरणाकडून विशेष परवानगी दिलेले उपक्रम, ४. या निबंधाना अपवादाच्या स्थितीत हे विभाग आणि प्राधिकरणांना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी लागेल. बंद राहतील.
स्विमिंग पुल, स्पा, वेलनेस सेंटर जिम, लूकारी हेअर कटिंग ब्युटी सलून सलून ५० टक्के क्षमतेने चालु ठेवणेस परवानगी असेल. तथापि व्यायाम करताना मास्कचा वापर करणे आवश्यक असेल.
२. केवळ संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच या सेवेचा वापर करणेस परवानगी असेल.
३. कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांचे संपुर्ण लसीकरण झालेले असणे बंधनकारक राहील.
१. ५० टक्के क्षमतेने चालू ठेवणेस परवानगी असेल.
२. रोज रात्री १० ते सकाळी ७ पर्यत बंद राहतील. ३. एकापेक्षा अधिक सुविधा असलेल्या आस्थापनांमध्ये इतर सुविधा बंद राहतील.
४. हेअर कटिंग सलून कोविडविरोधी वागणुकीचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच केस कापणा-या सर्वांचे लसीकरण पुर्ण झालेले असणे बंधनकारक आहे.
५. ब्युटी सलुनमध्ये अशीच सेवा देण्यात येईल ज्यात तोंडावरील मास्क काढणे आवश्यक नसेल. ६. अशी सेवा घेणारा व्यक्तीचे संपूर्ण लसीकरण झालेले असलेले झाले पाहिजे.७. यात काम करणा-या सर्व व्यक्तींचे संपुर्ण लसीकरण झालेले असावे.
खेळांच्या स्पर्धा
१. सर्व खेळाच्या स्पर्धा पुढे ढकलण्यास पात्र तथापि आधीच जाहिर केलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खालील नियमांचे पालन करून सुरू राहतील.
१. प्रेक्षकांना बंदी,
२. सर्व खेळाडू आणि अधिका-यांसाठी बायो- बबल
३. सहभागी होणा-या सर्व आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडूंसाठी भारत सरकारचे नियम लागू राहतील.
४. सर्व खेळाडू आणि अधिका-यांसाठी दर तीन दिवसांनी आरटीपीसीआर/आरएटी
२. शहर किंवा जिल्हा पातळीवर खेळांच्या शिबीरांना स्पधांना, कार्यक्रमांच्या आयोजनाला बंदी.
मनोरजन, उदयाने बंद राहतील.
प्राणिसंग्रहालये संग्रहालये, किल्ले आणि अन्य सशुल्क ठिकाणे/नागरीकांचे कार्यक्रम व स्थानिक पर्यटन स्थळे शांपोग मोल्स, मार्केट कॉम्पलेक्सेसमध्ये,बंधनांसह प्रवेश रेस्टॉरन्ट्स, उपाहारगृहे
१. ५० टक्के क्षमतेने चालू राहतील. सर्व आंगतुकांच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणावर एकूण क्षमता आणि सध्याची आंगतुकांची संख्या दर्शवणारा फलक लावणे बंधनकारक,
२. सर्व आंगतुक आणि कर्मचारी हे कॉविडरोधी वागणूकीचे तंतोतंत पालन करतील, याची दक्षता घेण्यासाठी आस्थापनांनी मार्शला नेमावेत,
३. RAT चाचणीसाठी बुध/किऑस्क ठेवावे, ४. फक्त लसीकरण पुर्ण झालेल्या व्यक्तिनाव परवानगी देण्यात येईल.
५. दररोज रात्री १० ते सकाळी ८ पर्यंत बंद राहतील.
१. ५० टक्के क्षमतेने चालू राहतील. २. सर्व आंगतुकांच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनो ठिकाणावर एकूण क्षमता आणि सध्याची आंगतुकांची संख्या दर्शवणारा फलक लावणे बंधनकारक, ३. फक्त लसीकरण पुर्ण झालेल्या व्यक्तिनाच परवानगी देण्यात येईल.
४. दररोज रात्री १० ते सकाळी ८ पर्यंत बंद राहतील, ५. सर्व दिवस घरपोच सुविधेस परवानगी राहील.
नाटयगृह, सिनेमा थिएटर्स
१. ५० टक्के क्षमतेने चालू राहतील. २. सर्व आंगतुकांच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनो ठिकाणावर एकूण क्षमता आणि सध्याची आंगतुकांची संख्या
दर्शवणारा फलक लावणे बंधनकारक. ३. फक्त लसीकरण पुर्ण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी देण्यात येईल. ४. दररोज रात्री १० ते सकाळी ८ पर्यंत बंद राहतील.
आंतरराष्ट्रीय प्रवास
भारत सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार
देशांतर्गत प्रवास कोविडविरोधी दोन लसी किंवा राज्यात प्रवेश करण्याआधी ७२ तासांपुवापर्यंत आरटीपीसीआर चाचणीचा निगेटीव्ह अहवाल ग्राहय धरण्यात येईल. हे हवाई रेल्वे आणि रस्ते या तिन्ही मार्गानी प्रवास करणा-या प्रवाशांना लागू राहील. सदरच्या तरतुदी या प्रवास करणारे वाहन चालक, वाहक आणि अन्य सहयोगी कर्मचा-यांनाही हे लागू राहील. कागो ट्रान्स्पोर्ट औदयोगिक कामकाज, बांधकाम सार्वजनिक वाहतूक इमारतीचे
पुर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीसाठी, नियमीत वेळांनुसार, युपीएससी, एमपीएससी, वैधानिक प्राधिकरणे, सार्वजनिक संस्था इत्यादी द्वारे घेतल्या जाणा-या परिक्षा लसीकरण पुर्ण केलेल्या व्यक्तीकडून सुरू राहील.
१. राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणा-या सर्व स्पर्धात्मक परिक्षा भारत सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पार पाडल्या जातील. अशा परिक्षांसाठीचे प्रवेशपत्र यासाठीच्या प्रवासाची अत्यावश्यकता सिद्ध करण्यासाठी पुरेसे असेल.
२. राज्याच्या पातळीवर घेण्यात येणा-या सर्व स्पर्धात्मक परिक्षा, ज्यांच्यासाठीची प्रवेशपत्रे आधीच निर्गमित झालेली आहेत किंवा ज्यांच्या तारखा आधीच निश्चित करण्यात आल्या आहेत त्या अधिसूचनेनुसार पार पडतील. अन्य सर्व परिक्षा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतरच पार पाडल्या जातील,
३. परिक्षांचे संचालन करताना कोविडरोधी नियमांचे काटेकोट पालन केले जाईल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन त्यासाठी निरीक्षक नेमतील.
१. प्रवासासाठी अत्यावश्यक कारणे १. तातडीचे वैदयकीय बाब.
२. अत्यावश्यक सेवा (अत्यावश्यक सेवांची यादी परिशिष्ट १ मध्ये दिल्यानुसार राहोल.)
३. विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानक येथे जाणे किंवा येणेसाटो येथ तिकोटासह ४. २४ तास सुरू राहणा. या कार्यालयांसाठी विविध शिफ्टमध्ये काम करण्यासाठी येथील कर्मचा-यांचा प्रवास अत्यावश्यक मानला जाईल.
१२. कोविडरोधी वागणुकीसाठीचे नियम परिशिष्ट २ मध्ये नमूद केल्यानुसार राहतील.
३. दुकाने, रेस्टॉरन्ट्स, हॉटेल्स तसेच ई-कॉमर्स किया होम डिलीव्हरी करणा-या आस्थापनावरील सर्व कर्मचा यांचे लसीकरण पुर्ण झालेले असणे बंधनकारक राहील. यासाठी व्यवस्थापनाला जबाबदार धरण्यात येईल. आणि यासाठी आवश्यक बाबींचे पूर्तता न केल्याचे आढळल्यास सदर आस्थापना जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून बंद करण्यात येईल. याकामात सहभागी असलेल्या कर्मचा-यांची नियमांत वेळेनंतर सदर आस्थापनेने RAT चाचणी करून घेणे गरजेचे आहे.
या पत्रकासोबत परिशिष्ट ९ मध्ये अत्यावश्यक सेवांची यादी आणि परिशिष्ट २ मध्ये कोविडरोधी वागणुकीशी संबंधित नियमांचा तपशिल जोडला आहे.
सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती/ संस्था अथवा संघटना यांचेवर भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतूदीनुसार दंडनिय/ कायदेशीर कारवाईस पात्र असून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतूदी आणि इतर कायदे आणि विशियम यानुसार कारवाई करणेत येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांचे विरुद्ध संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी कारवाई करावी. सदरचा आदेश दि.०९.०१.२०२२ रोजी माझे सही व शिक्क्यानिशी दिला असे...
0 Comments