google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महामार्ग भूसंपादनासाठी 20 ते 60% कमी मोबदला; राज्य सरकारचा जीआर जारी

Breaking News

महामार्ग भूसंपादनासाठी 20 ते 60% कमी मोबदला; राज्य सरकारचा जीआर जारी

 महामार्ग भूसंपादनासाठी 20 ते 60% कमी मोबदला; राज्य सरकारचा जीआर जारी  



महामार्गासाठी जमीन अधिग्रहित झाल्यास आता भूखंडधारकांना राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गासाठी कृषी (शेत) जमिनीचे अधिग्रहण झाल्यास 20 टक्के आणि अकृषक जमिनीचे अधिग्रहण झाल्यास 60 टक्के कमी मोबदला मिळेल. राज्य सरकारने याबाबत जीआर जारी केला असून या निर्णयामुळे भूखंडधारकांमध्ये निराशा पसरली आहे.



सरकारच्या या निर्णयामुळे भूखंडधारकांना मोठा फटका बसणार आहे. यापूर्वी आकृषी जमिनीसाठी मोबदला गुणक 2 दिला जात होता तो देखील आता अर्ध्यावर आला असून 1 केला आहे. तसेच भूखंडाचा मोबदला निश्चित करताना जो रेडीनेकरचा दर आहे तो सुद्धा 20 टक्के कमी करण्यात आला आहे.



दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजपने सडकून टीका केली आहे. आमच्या सरकारने समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांना भरपूर मोबदला दिला आहे. ज्यांना मोबदला मिळाला ते सर्व शेतकरी समृद्ध झाले. परंतु, महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना धुळीस मिळविण्याची तयारी करताना दिसते. अशी टीका समीर मेघे यांनी केली

Post a Comment

0 Comments