google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लसीकरण केंद्रावर थेट ‘बुस्‍टर डोस’ दिला जाणार केंद्राचा निर्णय. 10 जानेवारीपासून कोरोनाचा ‘बुस्‍टर डोस’ देण्याचा निर्णय

Breaking News

लसीकरण केंद्रावर थेट ‘बुस्‍टर डोस’ दिला जाणार केंद्राचा निर्णय. 10 जानेवारीपासून कोरोनाचा ‘बुस्‍टर डोस’ देण्याचा निर्णय

 लसीकरण केंद्रावर थेट ‘बुस्‍टर डोस’ दिला जाणार केंद्राचा निर्णय.


10  जानेवारीपासून कोरोनाचा ‘बुस्‍टर डोस’ देण्याचा निर्णय 


ज्यांनी अगोदर दोन डोस घेतलेले आहेत त्यांना ‘बुस्टर डोस’ घेण्यासाठी आता नव्याने नोंदणी करण्याची गरज नाही. ज्‍यांनी पहिले दोन्ही डोस घेतलेले असतील, त्‍यांना कोणतीही नोंदणी न करता, लसीकरण केंद्रावर थेट ‘बुस्‍टर डोस’ दिला जाणार असल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.



कोराेनाचा संसर्ग वाढत चालल्याने अनेक राज्यांमधील निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. त्यात ‘ओमायक्राॅन’चे संकट  वाढत चालल्यामुळे केंद्र सरकारने देशातील हेल्‍थ वर्कर, फ्रंन्टलाईन वर्कर, तसेच 60 वर्षांवरील नागरिकांना 10  जानेवारीपासून कोरोनाचा ‘बुस्‍टर डोस’ देण्याचा निर्णय घेतला आहे.



आरोग्य मंत्रालय ‘बुस्‍टर डोस’ देण्यासाठी आज (ता. 8) वेळापत्रक जाहीर करणार असल्याचे  सांगितले आहेत.. हा डोस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणीचीही सोय केली आहे. तसेच लसीकरण केंद्रावरही थेट लस घेता येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.



दरम्यान, याआधी कोरोनावरील ज्या कंपनीचे (कोव्‍हिशिल्‍ड, कोव्‍हॅक्‍सिन) दोन्ही डोस घेतलेले असतील, त्‍याच कंपनीचा ‘बुस्‍टर डोस’ दिला जाणार असल्याचेही केंद्र सरकारने स्‍पष्‍ट केले आहे. याबाबतचे नियम याआधीच जाहीर करण्यात आलेले आहेत. वाढत चाललेले संकट रोखण्यासाठी बूस्टर डोस हादेखील एक पर्याय आरोग्य विभाग व तज्ञांनी मांडला आहे.

Post a Comment

0 Comments