google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ‘मामा.. लवकर ये, आमचा गळा चिरलाय..!’ लातूरमधील थरारक घटनेने महाराष्ट्र हादरला…!

Breaking News

‘मामा.. लवकर ये, आमचा गळा चिरलाय..!’ लातूरमधील थरारक घटनेने महाराष्ट्र हादरला…!

 ‘मामा.. लवकर ये, आमचा गळा चिरलाय..!’ लातूरमधील थरारक घटनेने महाराष्ट्र हादरला…!



लातूर जिल्ह्यात अंगाचा थरकाप उडविणारी घटना समोर आलीय.. परिस्थितीसमोर हतबल झालेला माणूस किती टोकाचे पाऊल उचलू शकतो, हे या घटनेने समोर आणले आहे.. या घटनेचा तपास करताना लातूरचे पोलिसही हादरुन गेले… नेमकं असं काय घडलं, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.. 


लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे ही घटना घडली. एका शेतकऱ्याने पत्नी व दोन मुलांना विष पाजून ब्लेडने त्यांचा गळा चिरला. नंतर या शेतकऱ्यानेही विष प्राशन करून स्वत:चा गळा चिरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे नशीब बलवत्तर.. ऐनवेळी 14 वर्षीय मुलाला शुद्ध आल्याने मोठा अनर्थ टळला.



आतिश बाबूराव नरके (रा. लातूर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.. या घटनेत त्यांची पत्नी विशाखा (34), मुलगा पारस (14) आणि लोकेश (12) हे गंभीर जखमी झाले आहेत.



अशी घडली घटना..!

नरके कुटुंब गुरुवारी (ता. 6) दुचाकीवर अंबाजोगाई येथे फिरायला गेले होते, पण तेथे लॉज न मिळाल्याने, हे कुटुंब परत लातूरला निघाले. आतिश याने अचानक वाटेलगतच्या शेरा गावाकडे दुचाकी वळवली. एका शेतातील उसाच्या पिकाजवळ दुचाकी थांबवली. तेथे आतिश नरके याने ‘टॉनिक’ असल्याचे सांगून पत्नीसह दोन्ही मुलांना विष पाजले.



काही वेळातच तिन्ही माय-लेकरांची शुद्ध हरपली. त्यानंतर नरके याने तिघांच्याही गळ्यावर जोरात धारदार ब्लेडने वार केले. नंतर स्वत: विष प्राशन करुन ब्लेडने स्वत:च्याही गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर सगळेच बेशुद्ध झाले. काही वेळानंतर 14 वर्षीय पारसला जाग आली.



प्रसंगावधान राखत त्याने लगेच वडिलांच्या मोबाइलवरून मामा श्रीकांत पवार (रा. सुगाव, ता. अंबाजोगाई) यांना घटनेची माहिती दिली. पवार यांनी तातडीने नातेवाईकांसह घटनास्थळ गाठले. शेतात रक्ताचा सडा पडला होता.



स्थानिक नागरिकांच्या मदतीने पवार यांनी चौघांनाही लातूरच्या ‘एमआयटी’ रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर पारस व आतिष नरके हे शुद्धीवर आले. मात्र, लोकेश व विशाखा यांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचे सांगण्यात आले.



कशामुळे केलं हे कांड..?

शुद्धीवर आलेल्या आतिश नरके याने या घटनेबाबत माहिती दिली. कर्जबाजारीपणाला कंटाळून पत्नीसह मुलांची हत्या करून आत्महत्या करणार होतो, असे त्याने मेव्हुणे श्रीकांत पवार यांना सांगितले. पवार यांच्या फिर्यादीवरून रेणापूर पोलिसांनी नरके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

Post a Comment

0 Comments