google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पी पी पी तत्वावर सांगोला बसस्थानकाचे सुशोभीकरण व व्यापारी संकुलाच्या नवीन बांधकामास परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून मंजुरी -आमदार शहाजीबापू पाटील

Breaking News

पी पी पी तत्वावर सांगोला बसस्थानकाचे सुशोभीकरण व व्यापारी संकुलाच्या नवीन बांधकामास परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून मंजुरी -आमदार शहाजीबापू पाटील

 पी पी पी तत्वावर सांगोला  बसस्थानकाचे सुशोभीकरण व व्यापारी संकुलाच्या नवीन बांधकामास परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून मंजुरी -आमदार शहाजीबापू पाटील 


सांगोला/प्रतिनिधी,सांगोला तालुक्यातील सांगोला शहरातील बसस्थानकाचे बांधकाम १९७२ साली झाले असल्याने बसस्थानक जुने झाले आहे या साठी आमदार शहाजीबापू पाटील हे २०१९ विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्या पासून 



सांगोला शहरातील बसस्थानकाचे सुशोभीकरण करणे बसस्थानकात व्यापारी संकुलाचे बांधकाम करणे या कामासाठी आग्रही होते त्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील हे वारंवार शासन स्तरावर सतत पाठपुरावा करीत होते अखेरीस सोलापूर जिल्ह्याच्या शासकीय दौऱ्यासाठी आलेले



 परिवहन मंत्री अनिल परब व आमदार शहाजीबापू पाटील यांच्यात  पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीमध्ये सांगोला शहरातील बसस्थानकाचे सुशोभिकरण करणे व बसस्थानकात व्यापारी संकुल बांधणे हे काम पी पी पी तत्त्वावर मंजूर झाले असून   महिनाभराच्या काळात तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून कामाची सुरुवात करण्यात येईल असे आश्वासित केले



 सांगोला बसस्थानकाची जागा सुमारे नऊ एकर असल्याने तसेच बसस्थानक  सोलापूर- कोल्हापूर या मुख्य रस्त्यावर असल्याने बस स्थानकाचे सुशोभीकरण व नवीन व्यापारी संकुलाचे बांधकाम हे सांगोला शहराच्या वैभवात भर टाकणारे काम होणार आहे

 सांगोला तालुक्याच्या विकास कामासाठी मी कटिबद्ध असणार आहे यापुढे तालुक्याच्या विकासासाठी मी प्रयत्नशील आहे असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments