सांगोला नगरपरिषदेमार्फत विशेष कर वसुली मोहीम
थकबाकीरांचे गाळे होणार सील:मुख्याधिकारी कैलास केंद्रे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली 2 वर्ष सांगोला नगरपरिषदेने मालमत्ता,पाणीपट्टी वसुली साठी कठोर भूमिका घेतली नाही परिणामी खूप मोठ्या प्रमाणावर थकबाकी वाढली आहे.वारंवार सूचना देऊन,आवाहन करूनही त्याची दखल न घेणाऱ्या नगरपरिषद मालकीच्या गाळ्यांचा वापर करणाऱ्या थकबाकीदारांची गाळे थेट सील केले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी श्री.कैलास केंद्रे यांनी दिली.
नगरपरिषदेच्या कर विभागामार्फत वारंवार तोंडी सूचना देऊन,लेखी नोटीस देऊनही 31 मार्च 2021 अखेर पर्यंतची गाळा भाडे थकबाकी नगरपरिषदेकडे भरणा न केलेल्या म्हणजेच ज्यांच्याकडे गेल्या वर्षीपासूनची थकबाकी असणाऱ्या सर्व गाळ्यांना थेट सील करण्याची कारवाई* सांगोला नगरपरिषदेमार्फत सोमवार दिनांक:10/01/2022 पासून सुरू केली जाणार आहे.
सदरची कारवाई मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करनिरीक्षक श्रीमती.तृप्ती रसाळ यांच्या पथकामार्फत केली जाणार असून या पथकात योगेश रसाळ,रमेश मोरे, ओंकार उकळे इत्यादींचा समावेश आहे.सदर कारवाईत अडथळा निर्माण करणाऱ्यांवर शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचे समजून कडक कारवाई केली जाईल अशी माहिती मुख्याधिकारी केंद्रे यांनी यावेळी दिली.
शहरातील सर्व नागरिक,व्यापारी बंधू यांनी थकीत मालमत्ता कर,पाणीपट्टी,गाळा भाडे,खुली जागा भाडे इत्यादींचा तात्काळ नगरपरिषदेत भरणा करून होणारी कटू कारवाई टाळावी.
कैलास केंद्रे
मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद

0 Comments