ब्रेकिंग | पोलीस उपायुक्त बापू बांगर यांचे आदेश
सोलापूर : कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभुमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमिक्रॉन ही नवीन विषाणू प्रजाती आढळुन आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणु प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये/रहिवाशांमध्ये फार मोठया तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे.
या पार्श्वभुमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणुन मोठया प्रमाणात एकत्र न येता या वर्षी ३१ डिसेंबर, २०२१ (वर्ष अखेर) व नुतन वर्ष २०२२ चे स्वागत अंत्यत साधेपध्दतीने करणे अपेक्षित आहे, त्यादृष्टीने नागरिकांना खालीलप्रमाणे मार्गदर्शक सुचना देण्यात येत आहे.
१) कोरोनाच्या अनुषंगाने दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी व दि. १ जानेवारी २०२२ रोजी नववर्ष स्वागताच्या दृष्टीने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतोवर घरीच करावे.
२) मदत व पुर्नवसन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या उपरोक्त दि २४/१२/२०२१ रोजीच्या आदेशान्वये राज्यात दि २५/१२/२०२१ पासुन रात्री ०९.०० ते सकाळी ०६.०० वा. पर्यंत ५ पेक्षा अधिक लोक एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सदर आदेशाचे पालन करण्यात यावे.
(३) सोलापूर महानगरपालिकेने दि. २५/१२/२०२१ रोजीचे आदेशाप्रमाणे दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
४) हॉटेल, उपहारगृहे खादयगृहे इत्यादीबाबत यापुर्वी घालुन दिलेल्या अटी व शर्थीचे संबंधितांनी पालन करावे. दि. ३१/१२/२०२१ रोजी गर्दी जमेल अशा रितीने कोणतेही उपक्रम वा मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करू नयेत. ५) सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही, सोशल डिस्टन्सिंग राखले जाईल तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच त्याठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी.
६) कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ६० वर्षावरील नागरिकांनी व १० वर्षाखालील मुलांनी सुरक्षितेतच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे. ७) नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक / सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच मिरवणुका काढण्यात येवु नयेत.
८) नुतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्याठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.
९) फटाक्यांची आतषबाजी करण्यात येवु नये, ध्वनिप्रदुषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
(१०) फटाक्यांच्या अनुषंगाने १) मा. सर्वोच्य न्यायालयाने रिट पिटीशन (क) नं. ७२८/२०१५ मध्ये दि. ३०/१०/२०२१ रोजीचा निर्णय, २) वायुप्रदुषण ( प्रतिबंध व नियंत्रण) कायदा १९८१ व ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० चे अनुषंगाने केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने
दि. २७/०४/२०२१ रोजी दिलेला निर्देश ३) महाराष्ट्र ध्वनी प्रदूषण नियंत्रण बोर्ड, मुंबई यांचे पत्र क्रमांक MPCB/JD (APC)/Noise-Compensation/B-०१२९, दि.२२/०६/२०२१ अन्वये संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती/ संस्था यांच्यावर पुढील प्रमाणे कारवाई करण्यात येईल.
0 Comments