google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 तिसरीही मुलगीच झाली म्हणून आई वडिलांचे क्रूर कार्य, मुलीला जमिनीत जिवंत गाडल्याचा संशय

Breaking News

तिसरीही मुलगीच झाली म्हणून आई वडिलांचे क्रूर कार्य, मुलीला जमिनीत जिवंत गाडल्याचा संशय

 तिसरीही मुलगीच झाली म्हणून आई वडिलांचे क्रूर कार्य, मुलीला जमिनीत जिवंत गाडल्याचा संशय



तमिळनाडूमध्ये एका दाम्पत्याने तिसरीही मुलगीच झाली म्हणून नवजात बाऴाला जीवे मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तमिळनाडूच्या मदुराई जिल्हयात ही घटना घडली असून या प्रकरणातील आई वडिल हे त्यांच्या दोन मुलींसह फरार झाले आहेत.या दाम्पत्याने मुलीला जिवंत जमिनीत पुरले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.



ओ मुथूपांडी याची पत्नी असलेल्या कौसल्या हिने 21 डिसेंबर रोजी सेडापत्ती प्राथमिका आरोग्य केंद्रात एका सुदृढ बाळाला जन्म दिला. जन्मानंतर बाळाची प्रकृती ठणठणीत होती. सहा दिवसानंतर 26 डिसेंबर रोजी गावातील एक परिचारिका आई आणि बाळाची तपासणी करायला आली त्यावेळी कौसल्या हिने बाळ दगावल्याचे तसेच घरासमोर त्याचे अंत्यसंस्कारही केल्याचे त्यांनी त्या परिचारिकेला सांगितले. 



ते ऐकून तिला धक्काच बसला. परिचारिकेला हा संशयास्पद मृत्यू असल्याची शक्यता वाटल्याने तिने या घटनेची पोलिसात खबर दिली. परिचारिकेने पोलिसांना कळविल्यानंतर मुथूपांडी व कौसल्या घाबरले व त्यांनी त्यांच्या दोन मुलींना घेऊन गावातून पळ काढला.



दरम्यान आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून बाळाच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेण्यासाठी बाळाचा पुरलेला मृतदेह देखील बाहेर काढला जाऊ शकतो. याप्रकरणी पोलिसांनी पालकांविरोधात कलम 318 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments