google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पंढरपूर तालुक्यात पंधरा वर्षे वयाच्या मुलीवर पित्याकडून वारंवार बलात्कार !

Breaking News

पंढरपूर तालुक्यात पंधरा वर्षे वयाच्या मुलीवर पित्याकडून वारंवार बलात्कार !

 पंढरपूर तालुक्यात पंधरा वर्षे वयाच्या मुलीवर पित्याकडून वारंवार बलात्कार !


पाशवी बापाचे महापाप ! आपल्याच पंधरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार! गर्भवती होताच लाऊन दिले लग्न .... लहान मुलगी झाली माता !  


 पंढरपूर : आपल्याच अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून पीडिता गर्भवती राहिल्यानंतर दुसऱ्याशी लग्न लावून दिल्याचा, पिडीत महिलेची प्रसूती झाल्यानंतर हा  प्रकार पंढरपूर तालुक्यात उघडकीस आला असून  पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


नुकतेच पंढरपूर तालुक्यातील एका सुनेने आपल्या वासनांध सासऱ्याच्या विरोधात अंत्यत गंभीर स्वरुपाची तक्रार दिली आहे. स्नान करताना मोबाईलमधून चित्रण करून त्याच्या आधारे सुनेलाच ब्लॅकमेल केले जात होते. शारीरिक संबंध ठेवण्यासाठी धमकी दिली जात होती.



 ही घटना केवळ पंढरपूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात चर्चेची ठरली होती. अजून या घटनेची चर्चा आणि निंदा होत असतानाच पंढरपूर तालुक्यातील दुसरी एक मोठी घटना प्रकाशात आली आहे.



पंढरपूर तालुकयातील एका गावातील ५५ वर्षे वयाच्या व्यक्तीने आपल्याच पंधरा वर्षे वयाच्या मुलीवर  अत्याचार केले. पीडितेच्या अंगावरील कपडे काढून जवळ ओढून या नराधमाने वारंवार जबरदस्तीने पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.



 मागील ९ ते १० महिन्यात हा प्रकार सुरु होता. पिडीता जेंव्हा गर्भवती झाली तेंव्हा आरोपीने वेगळाच विचार केला आणि त्याने उरुळी कांचन येथील २३ वर्षाच्या तरुणाशी या मुलीचा विवाह करून दिला. पुणे जिल्ह्यातील तरुणाने कसलाही विचार न करता अल्पवयीन मुलीशी विवाह केला. 



सदर पिडीत अल्पवयीन मुलगी सोलापूर येथील रुग्णालयात प्रसूत झाली असून तिला एक मुलगी झाली आहे, आता या पिडीत मुलीने पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी तिचा पती आणि वडील याच्याविरोधात गुन्हा दाखल करून या नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत. सदर दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 



आजच्या या घटनेने पंढरपूर तालुका पुन्हा एकदा हादरला असून नात्यागोत्याचे तर पुरते धिंडवडे निघाले आहेत. सुनेने वडिलासमान सासऱ्यावर आणि मुलीचे आपल्या पित्यावर का आणि कसा विश्वास ठेवायचा हाच प्रश्न पंढरपूर तालुक्यात घडलेल्या या दोन घटनांनी उपस्थित केला आहे.



 पवित्र नात्यातही पाशवी वृत्ती कोठून जन्म घेते याचे उत्तर न मिळणारे प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत. पंढरपूर तालुक्यात पुन्हा एकदा या घटनेने खळबळ उडवून दिली असून बाप म्हणवून घेणाऱ्या या नराधमाचा निषेध केला जात आहे.



 सासरा लेकीसमान असणाऱ्या सुनेच्या देहाचे चित्रण करून शरीर संबंधासाठी धमकावतो, ज्या मुलीचे हात पिवळे करून मायेने डोळे भरून येणारा बाप तिच्या देहाचे लचके तोडतो ! समाजाच्या कुठल्या मानसिकतेची पातळी या घटना दाखवतात याचा कधी आणि कुणी विचार तरी करणार आहे की नाही ? ? ?

Post a Comment

0 Comments