नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांच्या हस्ते सुमारे 21 लाख रूपयांच्या विकासकामांचे उद्घाटन संपन्न
सांगोला/प्रतिनिधी ःसांगोला शहरामध्ये विविध विकास कामे सुरू आहेत. यामध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत बिपीन मोहिते घर ते कांबळे घर रस्ता काँक्रीट करणे व आरसीसी गटार करणे- कामाची रक्कम 17 लाख 51 हजार 425 रू, त्याचबरोबर
लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांच्या 15 टक्के निधीमधून जुना आरक्षण क्र. 46 बगीचासमोर काँक्रीटीकरण करणे- रक्कम 1 लाख 98 हजार 314 रू, व जुना आ.क्र. 46 बगीचासमोर पेव्हींग ब्लॉक बसविणे- 1 लाख 99 हजार 395 रू. अशा एकूण 21 लाख 49 हजार 134 रूपयांच्या विकासकामांचे उद्घाटन नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष बाळासाहेब केदार, आरोग्य सभापती रफिक तांबोळी, महायुतीचे गटनेते/नगरसेवक आनंदा माने, नगरसेवक प्रशांत धनवजीर, नगरसेवक अस्मिरभाई तांबोळी, नगरसेविका सौ. स्वातीताई मगर, नगरसेवक सुरेश माळी, राजू मगर यांच्यासह तेथील स्थानिक नागरिक उपस्थित होते
0 Comments