google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी योजना मेळाव्याचे आयोजन

Breaking News

सांगोला पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी योजना मेळाव्याचे आयोजन

 सांगोला पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी योजना मेळाव्याचे आयोजन 


सांगोला लाईव्ह: केंद्र आणि राज्य शासनाद्वारे पोस्ट ऑफिसमार्फत गुंतवणुकीच्या व बचत ठेवीच्या बऱ्याच योजना राबविल्या जातात त्यापैकी एक सुकन्या समृद्धी योजना. या सुकन्या समृद्धी योजनेचा मेळावा दिनांक ३ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०२१ पर्यंत सांगोला पोस्ट ऑफिस मध्ये आयोजित केला असल्याची माहिती सांगोला पोस्ट ऑफीसचे पोस्ट मास्तर श्री सदानंद गवळी यांनी दिली.


सदर योजना ही मुलींचे लग्न, शिक्षण, आरोग्य तसेच त्यांच्या उज्वल भविष्यासाठी गुंतवणूकीची बचत योजना आहे. यामध्ये मुलींच्या आईवडिल यांच्याकडून कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते उघडून या योजनेचा लाभ मुलींच्या भविष्यासाठी घेऊ शकतात.


सुकन्या समृद्धी बँक किंवा पोस्ट खात्यात दरवर्षी किमान रु. २५०/ किंवा जास्तीत जास्त १.५ लाख पर्यंत रक्कम भरून गुंतवणूक सुरू करता येते. खाते उघडल्यापासूनच्या तारखेपासून ते मुलीचे २१ वर्ष पूर्ण झाल्यावर मुलीच्या लग्नाच्यावेळी योजनेची मॅच्युरिटी होते.


सदर योजनेत खाते सुरू करण्यासाठी मुलीचे वय o ते १० वर्ष असावे. मुलीचा जन्माचा दाखला/मुलीचे आधार कार्ड, पालकांचे आधार कार्ड/पॅन कार्ड, पालकांचे तीन फोटो इ. कागदत्रांसह खात्यावर जमा करण्यासाठी २५० रूपये घेऊन सांगोला पोस्ट ऑफिस मध्ये खाते सुरू करावे तसेच सांगोला शहरातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. सदानंद गवळी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments