google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर ग्रामीण पोलिसांची प्रतिमा उंचावली; पाच कोटींहून अधिकचा मुद्देमाल फिर्यादींना केला परत

Breaking News

सोलापूर ग्रामीण पोलिसांची प्रतिमा उंचावली; पाच कोटींहून अधिकचा मुद्देमाल फिर्यादींना केला परत

 सोलापूर ग्रामीण पोलिसांची प्रतिमा उंचावली; पाच कोटींहून अधिकचा मुद्देमाल फिर्यादींना केला परत 


पोलीस म्हटलं की नागरिकात थोडसं नकारात्मक बोलले जात. परंतु, पोलीस प्रशासनात सुद्धा माणुसकी आहे. कर्तव्यतत्परता आहे. गोरगरीबांबद्दल अप्रूप आहे. आणि खाकी वर्दीचा अभिमान आहे.


यामुळेच जिल्हा ग्रामीण परिसरात चोरीला गेलेल्या मुद्देमालाचा तपास लावून त्या वस्तू त्या-त्या नागरिकांना त्यांची ओळख पटवून देण्यात आल्या. पाच कोटीहून अधिकचा मुद्देमाल तक्रारदारांना परत मिळवून देण्यात आला. यामुळे जनसामान्यात पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे. कुणाचं सोन… कोणाचे चांदीचे दागिने असोत, वाहने, रोख रक्कम असे एक नानाविध वस्तू चोरीला गेल्या होत्या. सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील २५ पोलीस ठाण्याकडे जवळपास १५ वर्षापासून वेगळ्या गुन्ह्यात जप्त व ताब्यात असलेल्या किंमती वस्तू मुद्देमाल,


जुलै ते नोव्हेंबर २०२१ दरम्यान या वस्तू परत देण्याची मोहीम हाती घेण्यात आली.

पाचशेहून अधिक लोकांना ५ कोटी ९१ लाख ४४ हजाराचा मुद्देमाल परत देण्यात आला.

एवढ्या किंमतीचा मुद्देमाल परत दिला

यात मंगळवेढा ४ कोटी ८ लाख, सोलापूर ग्रामीण ६९ लाख ६७ हजार, अक्कलकोट ५३ लाख ८९ हजार, बार्शी ८ लाख २ हजार, करमाळा ६९ लाख ५ हजार,


पंढरपूर ४२ लाख ४५ हजार, अकलूज २ लाख ११ हजार एवढ्या किंमतीचा मुद्देमाल परत देण्यात आला. हरवलेल्या वस्तू परत मिळाल्यानंतर अनेकांना रडू आवरलं नाही. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील सर्वोच्च अधिकारी, कर्मचारी यांनी ही उत्कृष्ट कामगिरी पार पाडली.

Post a Comment

0 Comments