संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या तिन वर्षीय चिमुकलीची हत्या करणाऱ्या काकूस केले जेरबंद.
३ वर्षीय चिमुकल्या मुलीचे अपहरण करुन तिची हत्या करणा-या आरोपीस यवतमाळ पोलीसांनी केले जेरबंद,मुलापेक्षा पुतणी हुशार म्हणून क्रूरकर्मा काकूने केला पुतणीचा खून.
संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवुन देणाऱ्या आर्णी तालुक्यातील कुऱ्हा डूमणी येथिल अवघ्या तीन वर्षीय चिमुकली च्या हत्याकांडातील आरोपीस अटक करण्यात यवतमाळ पोलीसांना यश आले आहे.
मानवी अविनाश चोले (३) रा. कुन्हा डूमणी ता. आर्णी असे हत्या करण्यात आलेल्या चिमुकलीचे नाव आहे.
मानवी ही घराच्या समोर खेळत असतांना अचानक बेपत्ता झाली होती. घरच्यांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला परंतू ती आढळली नाही. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार वडील अविनाश प्रकाश चोले यांनी दि.२० डिसेम्बर ला दिली होती.या तक्रारीवरुन आर्णी पोलीसांनी अपराध क्र. ९७९/ २०२१ कलम ३६३ भादवि अन्वये गुन्हा नोंद करुन तपास सुरु करण्यात आला.
सदर घटनेमुळे आर्णी परिसरात दहशतीचे वातावरण तयार होवून विविध अफवांना वाव मिळत होता. पोलीस विभागापुढे सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान उभे राहले होते. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेउन पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. दिलीप पाटिल-भुजबळ व डॉ.के. ए.धरणे अपर पोलीस अधिक्षक, यवतमाळ यांनी विशेष सदर गुन्ह्याच्या तपासाकरीता पोलीस स्टेशन स्तरावरील एक विशेष पथक, स्थानिक गुन्हे शाखेतील दोन पथक व सायबर सेल येथील एक असे एकुण चार पथक त्वरीत गठित करुन आर्णी परीसरात सतत कॅम्प करुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणुन आरोपीतांना अटक करण्याचे आदेश दिले. त्याच प्रमाणे सदर तपासात मदत म्हणुन वनविभागास सुद्धा मदतीस घेण्यात आले.
दि. २० डिसेंबर पासुन गावात पोलीसांनी कॅम्प करुन संपुर्ण गाव, शेत शिवार वनविभागाच्या मदतीने जंगल परिसर मुलीच्या शोधामध्ये पिंजुन काढले. घटनास्थळावर कोणताही भौतिक पुरावा उपल्बध नसतांना १०० चे वर गोपनीय बातमीदार नेमुन तांत्रिक बाबीचे संकलन करून तपास करण्यात आला, अनेक संशयितांची कसुन चौकशी करण्यात आली, घटनास्थळाजवळील परिसराचा पुर्व इतिहास पाहता पोलीस पथकांनी गुप्तधन काढण्याच्या उद्देशाने, कुकर्म करण्याच्या उद्देशाने, अपहरण, तसेच मुलगी विकण्याच्या उद्देशाने व आपसी मतभेद अशा विविध दिशेन तपास सुरु केला.
पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटिल भुजबळ, यवतमाळ यांनी स्वतः घटनास्थळास भेटी देवुन ग्रामस्थाशी संवाद साधुन तपास पथकांना मार्गदर्शन व सुचना दिल्या. या सर्व घटनांमुळे गावात दबाव निर्माण झाला. पोलीस अधीक्षक यवतमाळ हे काळी दौलत खाँ कडे रवाना होताच म्हणुन घाबरलेल्या आरोपीने स्वतःच्या बचावाकरीता अपहृत मुलीचा मृतदेह गावातीलच एका घराच्या मागील बाजुस फेकुन दिला.
अपहृत मुलीचा मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच स्वतः पोलीस अधिक्षक, यवतमाळ हे तात्काळ घटनास्थळी पुन्हा दाखल झाले व त्वरीत श्वान पथक, न्यायवैज्ञानिक पथक तसेच वैद्यकिय पथकास पाचारण करण्यात आले. या सर्व पथकास हाताशी घेऊन अज्ञात आरोपीची शोध मोहिमअहोरात्र राबविण्यात आली. श्वान पथकाने मोलाचे कार्य करीत थेट आरोपी नामे सौ. दिपाली ऊर्फ पुष्पा गोपाल चोले हिच्या स्वयंपाक घरातील मुख्य घटनास्थळी पोहचविले. त्यावरुन आरोपी सौ. दिपाली ऊर्फ पुष्पा गोपाल चोले व तिच्या पतीस ताब्यात घेउन विचारपुस केली असता सदर महिलेने अपहृत मुलीस ज्या दिवशी अपहरण केले त्याच दिवशी ठार केले व तिचा मृतदेह हा तिच्या स्वयंपाक घरातील गव्हाच्या छोट्या कोटी मध्ये लपवून ठेवला. गावामध्ये सतत पोलीसांचा वावर असल्याने अरोपीस मृतदेहाची
विल्हेवाट लावण्यास संधी मिळाली नाही. मुख्य आरोपीसह अजून कोणी अरोपीतांचा सहभाग आहे का याबाबत तपास सुरु आहे.
सदरची कार्यवाही डॉ. दिलीप पाटील-भुजबल पोलीस अधीक्षक, यवतमाळ, डॉ.के.ए. धरणे अपर पोलीस अधिक्षक, यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदिप परदेशी पोलीस निरीक्षक स्थागुशा, यवतमाळ व पितांवर जाधव पोलीस निरीक्षक आणी यांचे नेतृत्वात पोलीस स्टेशन स्तरावरील एक विशेष पथक, स्थानिक गुन्हे शाखेतिल दोन पथक व सायबर सेल येथील एक असे एकुण चार पथकांनी पार पाडली.
सदर गुन्ह्याचा आव्हानात्मक तपास अत्यंत व्यावसायिकतेने व कोशल्यपूर्णरितीने करून गुन्हा उघडकीस आणल्या बद्दल पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ यांनी तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना रुपये २५ हजार रोख पारितोषिक व प्रोत्साहनपर बक्षिस जाहीर केले आहे.
0 Comments