google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी सभासद मोहीम अभियान याप्रसंगी आज सांगोला येथे अजयसिंह इंगवले-पाटील यांच्या कार्यालयांमध्ये सभासद मोहिमेची बैठक पार पडली.

Breaking News

सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी सभासद मोहीम अभियान याप्रसंगी आज सांगोला येथे अजयसिंह इंगवले-पाटील यांच्या कार्यालयांमध्ये सभासद मोहिमेची बैठक पार पडली.

 सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी सभासद मोहीम अभियान याप्रसंगी आज सांगोला येथे अजयसिंह इंगवले-पाटील यांच्या कार्यालयांमध्ये सभासद मोहिमेची बैठक पार पडली.




 या बैठकीसाठी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे सह प्रभारी माननीय चेतनजी चव्हाण साहेब, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील  साहेब हे प्रमुख उपस्थित म्हणून होते. सांगोला तालुक्यांमध्ये काँग्रेस पक्ष वाढीसाठी सभासद नोंदणी मोहीम अत्यंत गरजेचे आहे. ती डिजिटल स्वरूपामध्ये येणार असल्याचे माननीय चेतनजी चव्हाण साहेब यांनी स्पष्ट केले.



 कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे व काँग्रेस पक्ष आपल्या तालुक्यामध्ये वाढावा. काँग्रेस पक्ष वाढी साठी सर्वांनी प्रयत्न करावेत. कॉंग्रेस हाच जनसामान्य माणसांचा आधार आहे. त्याचबरोबर सभासद नोंदणी करत असताना ती कशी मोहीम राबवायचि या संदर्भामध्ये चेतनजी चव्हाण साहेब यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांनी जास्तीत जास्त सांगोला तालुक्यांमध्ये सभासद नोंदणी करावी



 पक्षवाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत पक्षी नेहमीच त्यांच्या पाठीशी राहील असे मत त्यांनी आपल्या विचारातून व्यक्त केले. यावेळी सांस्कृतिक विभागाचे राज्य उपाध्यक्ष  ॲड. महादेव कांबळे यांनी सांगोला तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या पक्ष वाढीची कामाची माहिती माहिती सांगून पक्षासाठी सर्वांच्या सोबत काम करणार असल्याचे सांगून सांगोला तालुका मध्ये जास्तीत जास्त सभासद नोंदणी कशी होईल हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.



 कार्यक्रमाचे प्रास्ताविक  राजकुमार पवार यांनी केले तर पाहुण्यांचे प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अजयसिंह इंगवले-पाटील यांनी केले कार्यक्रमाचे आभार कॉंग्रेसचे युवा नेते रवींद्र कांबळे यांनी व्यक्त केले. या प्रमुख बैठकीस सोलापूर जिल्ह्याचे सह प्रभारी माननीय चेतन चव्हाण साहेब सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील त्याचबरोबर राज्य सचिव अजयसिंह इंगवले पाटील सांस्कृतिक विभागाचे राज्य उपाध्यक्ष ॲड. महादेव गोरख कांबळे, मा. अध्यक्ष राजकुमार पवार, कोळसे पाटील सर महिला काँग्रेसच्या  मैनाताई बनसोडे 



सांगोला शहराचे अध्यक्ष तोहिद मुल्ला , काँग्रेस युवक नेते रविंद्र कांबळे, विधानसभा सांगोला युवक अध्यक्ष सुनील नागणे, सांस्कृतिक विभागाचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय वाघमारे, विजयकुमार इंगवले-पाटील, संजय इंगवले डॉ. सागर इंगवले, विजयकुमार सूर्यवंशी, राजाभाऊ थोरात, नानासाहेब शेंडे, संजय खडतरे. प्रवीण मराळ, सागर लोखंडे अभिषेक कांबळे महेश शिंदे नागेश जाधव सचिन शेंडगे, मनोज सूर्यवंशी ना. मा. कांबळे गुरुजी त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे  पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments