भाईंच्या देवराईवरील भ्याड हल्याचा छडा लावणार : डॉ . बाबासाहेब देशमुख
सांगोला / प्रतिनिधी 1 भाई गणपतराव देशमुख यांनी तालुक्याला विकासाची दिशा दिली . त्यांच्या आठवणी चिरंतन राहाव्यात यासाठी नानासाहेबांनी स्वतःची दोन एकर जमीन देवून , वृक्ष लागवड केली . हे फार मोठे काम आहे . पण काही विघ्नसंतोषी लोक मुद्दामहून त्रास देत आहेत . पण याची शेकाप गांभीर्याने दखल घेत आहे . याचा छडा हा शेकापचे बहाद्दर कार्यकर्तेच लावणार . नानासाहेबांच्या पाठीशी राज्यभरातील कार्यकर्त्यांचा लवाजमा आहे . अशा भ्याड हल्ल्याला आम्ही भीक घालत नाही , असा विश्वास डॉ . बाबासाहेब देशमुख यांनी दिला .
राज्य सरकार वृक्ष लागवड आणि योजनांसाठी कोट्यवधी रूपये खर्च करते . सध्या माझी वसुंधरा अभियानही सुरूच आहे . पण डिकसळ गावामध्ये वसुंधरेचे रक्षक करण्याऐवजी काहीजण मुद्दामहूनभक्षक बनत आहेत . यांनी भाईंच्या देवराईचे व वनपरिक्षेत्राचेही बॅनर फाडले आहेत . ही अतिशय निंदनीय घटना आहे . या घटनेचा छडा शेकाप लावल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे पुरोगामी युवक संघटनेचे राज्य अध्यक्ष भाई डॉ . बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले .
सांगोला तालुक्यातील डिकसळ येथील भाईंच्या देवराईमधील बॅनर फाडल्याने , तालुकाभरातून निषेध व्यक्त केला जात होता . ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली होती . यावेळी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी भेट देत या घटनेचा निषेध नोंदविला . आज स्वर्गीय आ.भाई गणपतराव देशमुख यांचे नातू भाई डॉ . बाबासाहेब देशमुख यांनी भेट दिली आणि निषेध व्यक्त केला . ते पुढे म्हणाले की , स्व . आबासाहेब यांनी इतिहास घडविला . त्यांचा आठवणी अजरामर राहाव्यात म्हणून नानासाहेबांनी स्वतःची दोन एकर जमीन देवून , वृक्ष लागवड केली .
हे फार मोठे काम आहे . पण काही विघ्नसंतोषी लोक मुद्दामहून त्रास देत आहेत . पण याची शेकाप गांभीर्याने दखल घेत आहे . याचा छडा हा शेकापचेबहाद्दर कार्यकर्तेच लावणार . नानासाहेबांच्या पाठीशी राज्यभरातील कार्यकर्त्यांचा लवाजमा आहे . अशा भ्याड हल्ल्याला आम्ही भीक घालत नाही . बुधवारी झाला होता हल्ला बुधवारी रात्री काही समाजकंटकानी बॅनर फाडले . तेथे विष्ठा टाकली . हा निंदनीय प्रकार उघडकीस येताच तालुक्यात खळबळ उडाली . पोलिसांनी तातडीने दखल घेत घटनास्थळी भेट दिली होती .
राज्यातील आदर्शवत प्रकल्प भाईंची देवराई हा राज्यातील एकमेव आदर्शवत प्रकल्प आहे . या प्रकल्पात शेकडो दुर्मिळ वनौषधी आहेत . ही सर्व झाडे जोमाने डोलू लागली आहेत . असे असताना असा हल्ला करणे अत्यंत चुकीचे आहे . यावेळी बंडू वाघमोडे , मधुकर गोरड , प्रा . राणोबा करांडे , तुकाराम गोरड , काकासाहेब करांडे , अप्पा भूसनर , सोपान करांडे , चेअरमन प्रकाश भूसनर , रावसाहेब निळे , दिनेश भूसनर , डॉ . खरात , रोहित करताडे , बाबा उजनीकर , अण्णासो गेजगे , हरी गेजगे यांच्यासह युवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता .

0 Comments