सांगोल्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह शासकीय नियमांचे पालन करावे : सांगोला तालुका आरोग्य विभाग
सांगोला / प्रतिनिधी : कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना सांगोला तालुक्यात आरोग्य विभागाकडून पुन्हा एकदा नव्याने नागरिकांची चाचणी करण्याची मोहीम राबवली जात आहे . दरम्यान या तपासणीमध्ये वाढेगाव येथील एका नागरिकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे . सदर पॉझिटिव्ह व्यक्तीला विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे .
इतर सर्व तपासण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे . एकंदरीत एक रुग्ण वगळता तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नसल्याची माहिती सांगोला तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे . कोरोना - ओमिक्रोन चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सर्वच बाजुने प्रयत्नशील आहे . शासकीय तथा निमशासकीय कार्यालयात प्रवेश करण्यासाठी नागरिकांना कोरोना चे दोन डोस बंधनकारक करण्यात आले आहेत . यासह पुन्हा एकदा नव्याने मास्क आणि सोशल डिस्टन चा नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे .
असे असले तरी नागरिकांमध्ये या संदर्भात कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे . आगामी संकट टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे . कोरोना संदर्भात लसीकरण शंभर टक्के करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे . नागरिकांनी प्रतिसाद द्यावा . या संदर्भात ही प्रसिद्धी आणि जनजागृती केली जात आहे . दरम्यान कोरोना ची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ जवळच्या दवाखान्याची संपर्क साधावा सर्व प्रथम चाचणी करून घ्यावी असे आवाहन सांगोला तालुका आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे .

0 Comments