google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर ग्रामीण पोलीसांची विशेष कामगिरी फेसबुकचे बनावट अकाऊंट तयार करून पैशाची मागणी करणा - या दोघांना राजस्थान व उत्तरप्रदेश राज्यातून अटक ....

Breaking News

सोलापूर ग्रामीण पोलीसांची विशेष कामगिरी फेसबुकचे बनावट अकाऊंट तयार करून पैशाची मागणी करणा - या दोघांना राजस्थान व उत्तरप्रदेश राज्यातून अटक ....

 


सोलापूर ग्रामीण पोलीसांची विशेष कामगिरी फेसबुकचे बनावट अकाऊंट तयार करून पैशाची मागणी करणा - या दोघांना राजस्थान व उत्तरप्रदेश राज्यातून अटक ....



मागील काही महिन्यांपासून फेसबुक वरील प्रोफाईल ची कॉपी करून फेक प्रोफाईल बनवून सदरची व्यक्ती ही तिच • आहे असे भासवून वेगवेगळ्या अडचणी असल्याचे कारणे सांगून तात्काळ पैशाची आवश्यकता असल्याचे भासवून फोन पे व्दारे / गुगल पे इत्यादी सारख्या ऑनलाईन अॅपव्दारे पैशाची मागणी करण्याचे प्रकारामध्ये वाढ झालेली आहे . सामान्यतः समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती , प्रशासकीय अधिकारी इत्यादी व्यक्तींचे मुख्यतः फेक प्रोफाईल बनवून फसवणूकदार पैशांची मागणी करत असल्याच्या घटना घडल्या आहेत .

माहे जानेवारी २०२१ मध्ये सोलापूर जिल्हयातील एका प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे फेसबुक फेक अकाउन्ट तयार करून त्यांचे मित्र , नातेवाईक व ओळखीच्या लोकांना फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवून पैशांची तात्काळ गरज असल्याचे भासवून त्यांना फोन पे / गुगल पे चे नंबर देवून सदर मोबाईल नंबरवर पैसे पाठविण्याबाबत सांगितले . त्यातील दोन व्यक्तींनी अनुक्रमे १०,००० रू.व ७,००० रु . रक्कम संबंधीत मोबाईल नंबर वर रजिस्टर असलेल्या फोन पे व गुगल पे अकाउन्टवर पैशे पाठवून त्यांची फसवणूक केल्याने माढा पोलीस ठाणे येथे गुरंन २२ / २०२१ भादविसंक ४१ ९ , ४२० व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ ( सी ) , ६६ ( डी ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . 



तसेच माहे आक्टोंबर २०२१ मध्ये मा . पोलीस अधिक्षक , सोलापूर ग्रामीण यांचे फेसबुक वरील प्रोफाईल ची माहिती कॉपी करून त्याचसारखे बनावट फेसबुक अकाउन्ट तयार करून त्यांचे जवळचे मित्र , नातेवाईक व ओळखीच्या लोकांना Friend Request पाठवून पैशाची तात्काळ गरज असल्याचे भासवून त्यांना मोबाईल नंबर देवून त्यावर रजिस्टर असलेल्या फोन पे / गुगल पे अकाउन्टवर पैसे पाठविण्याबाबत सांगितल्याने सदरची बाब गंभीर असल्याने अज्ञात इसमाविरुध्द सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे गुरंन ८२१/२०२१ भादविसंक ४१ ९ , ४२० इत्यादी व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ ( सी ) , ( डी ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . 



सदर दोन्ही गुन्हयाचा तपास सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडूळे , प्रभारी अधिकारी सायबर पोलीस ठाणे यांचेकडे देण्यात आलेला होता . सदर दोन्ही गुन्हयांचा तांत्रिक तपास व विश्लेषण करून सदर गुन्हयातील आरोपींची माहिती निष्पन्न करून मा . पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण , मा . अपर पोलीस अधिक्षक , सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडूळे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री . सर्जेराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली दोन तपास पथके तयार करून त्यांना सदर गुन्हयाबाबत माहिती सांगून त्यांना उत्तर प्रदेश , व राजस्थान या ठिकाणी रवाना करण्यात आले . 



सदर पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींची माहिती काढून दोन्ही गुन्हयातील एक - एक असे एकूण ०२ आरोपीतांना गुन्हा करण्याकरीता वापरलेले मोबाईल फोन तपासकामी जप्त करून त्यांना जेरबंद करण्यात आले . वरील दोन्ही गुन्हयातील आरोपींना मा . न्यायालयात हजर केले असता त्यांना २० डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे . 



सदरची कामगिरी मा . पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते , मा . अपर पोलीस अधिक्षक श्री . हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली , सायबर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री . श्रीकांत पाडूळे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री . सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सपोनि शशिकांत शेळके , पोसई गणेश पिंगुवाले , शैलेश खेडकर , सुरज निंबाळकर , पोलीस अंमलदार मनोज भंडारी , मोहन मनसावाले , दत्ता खरात , विशाल टिंगरे , सचिन मसलखांब , सचिन दरदरे , अन्वर अत्तार अर्जुन केवळे यांनी केली आहे .

Post a Comment

0 Comments