शिवप्रेमी कार्यकर्त्यांकडून सांगोल्यात बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली
बाबासाहेबांचे विचार व कार्य तरुणांनी आत्मसात करावे प्राध्यापक संदीप सावेकर सांगोला (प्रतिनिधी)
महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्याचे निर्माते आणि ज्यांच्या नुसत्या नावाने थरकाप उडायचा त्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीता जागता इतिहास उभा करणारे शतायुषी शिवशाहीर स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांचे आदर्श विचार व त्यांनी सात दशके प्रबोधनाचे कार्य केले या कार्याचा आजच्या तरुणांनी आदर्श घेऊन त्यांचे विचार आत्मसात करून त्यांची स्फूर्ती घेऊन त्यांचे विचार तळागाळातील सर्व सामान्य जनते पर्यंत पोहोचवावेत असे आवाहन पंढरपूर येथील
प्रा.संदीप सावेकर यांनी सांगोला येथे शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी महादेव मंदिरात आयोजित केलेल्या सर्वपक्षीय शोकसभेत बोलताना केले त्यांनी
स्व. बाळासाहेब पुरंदरे यांचे अनेक आठवणींना उजाळा देऊन देशासाठी समर्पित निस्वार्थ भावनेने त्यांनी आयुष्य खर्ची घालून शिवचरित्र घराघरात पोचविण्याचे महान कार्य केले त्या शिवशाहीरानां मानाचा मुजरा करून श्रद्धांजली अर्पण केली.
नगराध्यक्षा सौ राणीताई माने ,शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ बाबासाहेब देशमुख, भाजपा जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख ,काँग्रेस पक्षाचे नेते प्राध्यापक पी सी झपके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नगरसेवक सचिन लोखंडे ,सामाजिक कार्यकर्ते पत्रकार नागेश जोशी, ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत लि गा डे आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष अरविंद येलपले, प्राध्यापक डॉ भगवंत कुलकर्णी, डॉ रणजीत केळकर, पुरोहित संघाचे श्रीपाद वांगीकर गोपाळ देशपांडे, डॉ मानस कमलापुरकर ,आदी मान्यवरांनी स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांचे निस्वार्थ पणे केलेले कार्य त्यांचा सांगोला करन्सी आलेला
जवळून संबंध सांगोले करांशी आलेला संबंध सांगोल्यात त्यांचे महादेव मंदिर, अंबिका मंदिर ,न्यू इंग्लिश स्कूल येथे झालेली व्याख्याने त्यांनी दिग्दर्शन केलेल्या जाणता राजा या नाटकाचे झालेले प्रयोग या आठवणींना उजाळा दिला व त्यांनी आयुष्यभर केलेल्या कार्याचा उल्लेख करून विविध संस्थेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. ज्ञानेश्वर महाराज यांचे सामूहिक पसायदानाने सभेची सांगता झाली या शोकसभेला विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांचे वर प्रेम करणारे ज्ञानेश्वर कुलकर्णी ,संतोष सोनंदकर ,संतोष जोशी ,भारत गडहिरे, अनिरुद्ध पुजारी, अमोल लहुळकर ,अनिल कुलकर्णी प्रसाद फुले ,संजय जांगळे, बिंदु माधव पतकी ,संजय गव्हाणे, अनिल वाघमोडे ,मयुरेश गुरव, प्रविण जानकर, श्रीकांत सबनीस, सुजित जोशी ,
ऋषिकेश पुजारी, अखिलेश पतकी, रवींद्र कुलकर्णी,
विजय जोशी ,इंद्रजित गुरव शिरीष कुलकर्णी ,स्वप्निल सूर्यवंशी ,सोमनाथ गुरव ,संचीत जोशी, शामकांत देशपांडे ,निलेश ताकभाते, अभिजीत शिंगाडे, मंगेश कुलकर्णी, साहिल वांगीकर संजय व्हटे सर, गणेश देशपांडे, मंथन बेले, सुबोध कुलकर्णी, ऋषिकेश जोशी ,सुदीप बेले, ओंकार कुलकर्णी, तेजस कुलकर्णी, उदय पुजारी ,संस्कार कमलापुरकर ,दीपक पतकी ,
शेषमल आमणे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments