महाविकास आघाडीकडून भाजपला धोबीपछाड, सर्वाधिक जागा जिंकत बँकेवर वर्चस्व
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहे.
सांगली, 23 नोव्हेंबर : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे निकालसमोर आले आहेत. या निवडणुकीत 18 जागांसाठी 46 उमेदवार रिंगणात होते. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी सरळ लढत या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळाली होती. निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी सर्वाधिक जागा जिंकत बँकेवर वर्चस्व मिळवलं आहे. यामुळे भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
निवडणुकीच्या आधीच तीन जागा या महाविकास आघाडीने बिनविरोध जिंकल्या होत्या. त्यानंतर 18 जागांसाठी ही निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत एकूण 85 टक्के मतदान झालं होतं. या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील तसेच काँग्रेसचे नेते कृषिराज्यमंत्री विश्वजीत कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती.
धक्कादायक निकाल काँग्रेस आमदार पराभूत
या निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर आला आहे. काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांचा पराभव झाला आहे. भाजपचे प्रकाश जमदाडे यांनी आमदार विक्रम सावंत यांचा पराभव केला आहे. प्रकाश जमदाडे यांना 45 मते मिळाली तर आमदार विक्रम सावंत यांना 40 मते मिळाली.
महाविकास आघाडीच्या पॅनलचे 17 उमेदवार निवडून आले असून भाजप प्रणित पॅनलचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत.
कुठल्या पक्षाने किजी जागा जिंकल्या?
राष्ट्रवादी काँग्रेस - 9
काँग्रेस - 5
भाजप - 4
शिवसेना - 3
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक निकाल
मिरज सोसायटी गट
विशाल दादा पाटील (आघाडी) 52 विजयी
उमेश पाटील (भाजप) 16
आटपाडी सोसायटी गट
तानाजी पाटील (आघाडी) 40 विजयी
राजेंद्रअण्णा देशमुख (भाजप) 29
कडेगांव सोसायटी गट
मोहनराव कदम (आघाडी) 53 विजयी
तुकाराम शिंदे (भाजप) 11
तासगाव सोसायटी गट
बी. एस. पाटील (आघाडी) 41 विजयी
सुनील जाधव (भाजप) 22
ऍड. प्रताप पाटील (अपक्ष) 15
वाळवा सोसायटी गट
दिलीप तात्या पाटील (आघाडी) 108 विजयी
भानुदास मोटे (भाजप) 23
कवठेमंकाळ सोसायटी गट
अजितराव घोरपडे (आघाडी) 54 विजयी
विठ्ठल पाटील (अपक्ष) 14
जत सोसायटी गट
प्रकाश जमदाडे (भाजप) 45 विजयी
विक्रमसिंह सावंत (आघाडी) 38
महिला राखीव गट
अ जयश्रीताई पाटील (आघाडी) 1688 विजयी
ब अनिता सगरे (आघाडी) 1408 विजयी
संगीता खोत (भाजप) 579
दिपाली पाटील (भाजप) 405
अनुसूचित जाती गटात
महाआघाडीचे विद्यमान संचालक
बाळासो होनमोरे 1503-548 मतानी विजयी.
भाजपचे रमेश साबळे पराभूत.
ओबीसी गटात
महाविकासआघाडीचे मन्सूर खतीब 1395 मते मिळवून विजयी.
भाजपचे रवि तम्मणगौडा यांना 772 मते मिळाली.
विकास महाआघाडीचे चिमण डांगे विजयी
महाआघाडीचे वैभव शिंदे विजयी
शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर साताऱ्यात राडा
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक झाली आहे. शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक करणार्या कार्यकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
0 Comments